सकाळ डिजिटल टीम
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात वसलेला 'रघुवीर घाट' कोकणातील निसर्गप्रेमींसाठी एक लोकप्रिय पर्यटनस्थळ बनत आहे.
Raghurveer Ghat Tourism
esakal
समुद्रसपाटीपासून सुमारे १४०० मीटर उंच असलेला हा घाट थंड हवामान, हिरवळ आणि पावसाळ्यातील धबधबे यामुळे पर्यटकांना आकर्षित करतो.
Raghurveer Ghat Tourism
esakal
पावसाळा सुरू होताच घाटावर पुणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा तसेच परदेशातून पर्यटक भेट देतात.
Raghurveer Ghat Tourism
esakal
खोपी गावाच्या हद्दीत असलेल्या या घाटाचे सौंदर्य वर्षभर निसर्गप्रेमींना मोहवते.
Raghurveer Ghat Tourism
esakal
रघुवीर घाट सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार मानला जातो. येथून कांदाटी खोऱ्यात जंगल सफारी सुरू करण्याची संधी असल्यामुळे, वन्यजीव निरीक्षक आणि साहसप्रेमींसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.
Raghurveer Ghat Tourism
esakal
खेड शहर हा घाटासाठी मुख्य प्रवेशद्वार असून, कोकण रेल्वेवरील खेड स्थानक व खेड बस स्थानकातून बस आणि स्थानिक वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत.
Raghurveer Ghat Tourism
esakal
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गामुळे खासगी वाहनांद्वारेही सहज पोहोचता येते. रत्नागिरी (११६ किमी), पुणे (२९३ किमी) आणि मुंबई (३२८ किमी) ही प्रमुख विमानतळे घाटासाठी प्रवेशद्वार ठरू शकतात.
Raghurveer Ghat Tourism
esakal
Patan Tourism
esakal