सकाळ डिजिटल टीम
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका हा निसर्गरम्य सौंदर्याने नटलेला आणि पर्यटकांना भुरळ पाडणारा भाग आहे.
Patan Tourism
esakal
पावसाळ्याच्या दिवसात हा परिसर हिरवाईने नटतो, धबधबे, तलाव आणि गर्द झुडूपांनी निसर्ग प्रेमींना आपल्याकडे आकर्षित करतो.
Patan Tourism
esakal
महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे धरण म्हणजे कोयना धरण. साताऱ्याला भेट देताना हे ठिकाण नक्की पाहावे. धरणाचा विशाल परिसर आणि सभोवतालची हिरवाई पर्यटकांचे मन मोहून टाकते.
Patan Tourism
esakal
धारेश्वर हे ठिकाण प्राचीन गुंफा आणि धबधब्यांसाठी ओळखले जाते. या ठिकाणी पर्यटकांना निसर्गासोबत इतिहासाची अनुभूतीही मिळते.
Patan Tourism
esakal
ढोकी हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे, जे पावसाळ्यात अजूनच सुंदर दिसते. या परिसरात तुम्हाला अनेक निसर्गरम्य धबधबे पाहायला मिळतील.
Patan Tourism
esakal
सडावाघापूर धबधबा हा एक आगळावेगळा धबधबा आहे, जिथे पाण्याचे थेंब हवेत उडताना दिसतात. पावसाळ्यात हा धबधबा अजून आकर्षक बनतो.
Patan Tourism
esakal
पावसाळ्यात पाटणच्या हिरवळीने नटलेल्या परिसरात थंड हवेचा अनुभव घेण्यासाठी, तसेच निसर्गरम्य स्थळांचे दर्शन घेण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. पर्यटकांनी पाटणच्या या निसर्गरम्य ठिकाणांची सफर अवश्य करावी.
Patan Tourism
esakal
Nepal Tourist Places
esakal