Konkan Best Tourist Places : खरं कोकण जर पाहायचं असेल तर ‘ही’ ठिकाणं बघाच!

Mayur Ratnaparkhe

गणपतीपुळे बीच – रत्नागिरी

पांढरी वाळू, निळं समुद्र आणि स्फूर्ती देणारा गणपती मंदिर — कोकणातलं सर्वाधिक लोकप्रिय ठिकाण. सूर्यास्त इथला खास आकर्षण!

तारकर्ली – सिंधुदुर्ग -

पाण्याची पारदर्शकता आणि Scuba Diving मुळे प्रसिद्ध. कोकणातील मालदीव म्हणून ओळख!

सिंधुदुर्ग किल्ला – मालवण -

छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात वसवलेला भव्य किल्ला. इतिहास, किल्ले आणि समुद्राचं अद्भुत मिश्रण!

हरिहरेश्वर – रायगड -

शांत समुद्रकिनारा आणि प्राचीन हरिहर मंदिरासाठी प्रसिद्ध. निसर्ग आणि आध्यात्मिकतेची अनोखी भेट.

दिवेआगर – रायगड -

स्वच्छ किनारा, सुवर्ण गणपती मंदिर आणि प्रचंड शांतता. कुटुंबासाठी उत्तम पर्यटनस्थळ!

आंबोली – हिल स्टेशन -

धबधबे, दाट धुके आणि थंड हवामान निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग. ️ मान्सूनमध्ये आंबोलीची शोभा अवर्णनीय!

अलिबाग – रायगड -

समुद्रकिनारे, किल्ले आणि वॉटर स्पोर्ट्सचे हब.वीकेंडसाठी सर्वात जवळचं आणि उत्तम ठिकाण.

मुरुड-जंजिरा किल्ला -

अभेद्य समुद्रकिल्ला, इतिहासप्रेमींसाठी खास आकर्षण.  नौकेने जाऊन पाहण्याचा अद्वितीय अनुभव!

दापोली – मिनी महाबळेश्वर -

समुद्रकिनारे, डॉल्फिन सफारी आणि हिरवीगार टेकड्या. डॉल्फिन पाहण्यासाठी सर्वोत्तम!

Next : हवामान विभाग थंडीच्या लाटेचा इशारा देण्याआधी थंडी किती तीव्र असते?

Cold Weather

|

ESakal

येथे पाहा