Yashwant Kshirsagar
आपल्या देशात दरवर्षी सर्पदंशाच्या सुमारे दोन लाख घटना घडतात आणि त्यात सुमारे पंधरा हजार व्यक्ती मृत्यू होतो.
एक़ा अभ्यासानुसार सर्पदंशाच्या 88 टक्के घटना ग्रामीण भागात होतात.
उद्याने, नद्या-नाले, जंगल किंवा डोंगराळ भाग असेल तर तुम्हाला अधिक सावध राहण्याची गरज आहे.
उन्हाळा असो वा पावसाळा, साप कोणत्याही हवामानात तुमच्या घरात शिरकाव करू शकतात. काही लोक साप चावल्यास घरगुती उपचार करतात, मात्र डॉक्टरकडे गेले पाहिजे.
आयुर्वेदात अशा काही गोष्टींचा उल्लेख आहे, ज्या सापाच्या विषाचा प्रभाव कमी करू शकतात. त्यापैकी एक आहे कर्टुल्याची वनस्पती.
साप चावल्यानंतर वैद्यकीय मदत मिळेपर्यंत कर्टुल्याच्या वनस्पतीचा वापर केला तर विषाचा प्रभाव काही प्रमाणात कमी होतो आणि मोठा धोका टाळता येऊ शकतो.
कर्टुल्या भाजीच्या वनस्पतीच्या मुळ्या या सापाच्या विषावर गुणकारी आहेत. या मुळांची पावडर विषाचा प्रभाव कमी करते.
एका रिपोर्टनुसार, कर्टुल्याच्या वनस्पतीच्या मुळापासून तयार केलेले चूर्ण आयुर्वेदिक औषधी ही अँटिव्हेनम म्हणून वापरले जात आहे.
कुर्टुल्याची भाजी आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे कारण यात अनेक औषधी गुणधर्म आणि घटक तसेच प्रथिनांचे प्रमाणही खूप जास्त आहे.