Pranali Kodre
पुण्याच्या तळेगाव दाभाडे परिसरात गेल्या काही वर्षांपासून दक्षिण कोरियन नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे हा परिसर आता 'मिनी कोरिया' म्हणूनही ओळखला जात आहे.
मिडिया रिपोर्ट्सनुसार हजारो कोरियन नागरिक सध्या तळेगावच्या आसपास राहतात. यात कामानिमित्त आलेले व्यावसायिक त्यांचे कुंटुंबीय, लहान मुले आणि वृद्ध यांचा समावेश आहे.
खरंतर तळेगाव, चाकण आणि शिक्रापूर येथील एमआयडीसी (MIDC) परिसरात असलेल्या ह्युंदाई मोटर कंपनी, पोस्को (POSCO), लोटे (Lotte Corporation) आणि सुंगवू हाईटेक (Sungwoo Hitech) सारख्या मोठ्या कोरियन कंपन्यां आहेत.
कोरियन कंपन्यांमुळे या भागांमध्ये कोरियन नागरिकांचा वावर वाढला आहे. त्यामुळे भागांमध्ये कोरियन गेस्टहाऊस, रेस्टॉरंट आणि मॉल सुरू झाले आहेत. यामुळे स्थानिक लोकांना कोरियन संस्कृतीचा अनुभव घेता येत आहे.
सोमुनान हॉटेल, ईडन रेस्टॉरंटसारखी ठिकाणे कोरियन जेवण आणि निवास व्यवस्था देतात. कॅफे अन्न्योंगसारखी रेस्टॉरंट्स भारतीयांमध्येही लोकप्रिय आहेत.
तळेगावचे रहिवासी आता के-पॉप नृत्य, कोरियन भाषा शिकायला लागले आहेत. तसेच सियोलच्या दोलायमान परिसरांसारख्या थीम्ड उत्सवांमध्ये भाग घेऊ शकतात.
यामुळे पर्यटनाला चालना मिळाली आहे. इंस्टाग्राम-अनुकूल स्ट्रीट म्युरल्स, थीम्ड फोटो झोन आणि कोरियन-शैलीतील गार्डन्स सोशल मीडिया प्रेमींना आकर्षित करत आहेत.