कोथळीगड किल्ला पहिला का? बाहेरून दिसतो दगडी सुळका, आत आहे भुयारी मार्ग

Aarti Badade

सह्याद्रीतील अनोखा कातळसुळका!

कर्जत-भीमाशंकरच्या हिरव्यागार पर्वतरांगांमध्ये पेठ गावाजवळ उभा असलेला कोथळीगड म्हणजे महाराष्ट्राच्या दुर्गवैभवातील एक अनोखे रत्न आहे.

Kothaligad Fort

|

Sakal

कोथळीगडाचे सामरिक महत्त्व काय?

कोकण आणि मावळला जोडणाऱ्या व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे होते. कोलिंबा आणि सावळे घाटांवर नजर ठेवणारा हा एक महत्त्वाचा दुर्ग होता.

Kothaligad Fort

|

Sakal

शिवकाळात लष्करी चौकी म्हणून वापर!

कोथळीगडाचा वापर टेहळणी, संदेशवहन आणि सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे. शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याच्या साठ्यासाठीही या गडाला महत्त्व होते.

Kothaligad Fort

|

Sakal

गडावर पाहायला मिळतात प्राचीन गुहा!

पेठ गावातून गडाकडे जाताना कातळात खोदलेल्या गुहा आणि पाण्याच्या टाक्या दिसतात. यामध्ये देवीची गुहा आणि आकाराने मोठी असलेली भैरोबाची गुहा विशेष लक्षवेधी आहे.

Kothaligad Fort

|

Sakal

कातळाच्या पोटात कोरलेला भुयारी जिना!

कोथळीगडाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे कातळसुळक्याच्या आत खोदलेला गोलाकार दगडी जिना. या जिन्याने थेट गडाच्या माथ्यावर जाता येते.

Kothaligad Fort

|

Sakal

औरंगजेबाने गडाचे नाव बदलले होते!

१६८४ मध्ये औरंगजेबाने हा किल्ला जिंकण्यासाठी अब्दुल कादीरला पाठवले. किल्लेदार नारो त्रिंबक यांच्या अनुपस्थितीत विश्वासघाताने गडाचा ताबा मोगलांकडे गेला. विजयानंतर औरंगजेबाने या गडाचे नाव ‘मिफ्ताहुलफतेह’ ठेवल्याचा उल्लेख आढळतो.

Kothaligad Fort

|

Sakal

कोथळीगडाचा इतिहास आजही देतो साक्ष!

२ नोव्हेंबर १८१७ रोजी बाजीराव पेशव्यांच्या सेनापती बापूराव यांनी हा गड जिंकला; मात्र पुढे तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. आज गडावरून चंदेरी, प्रबळगड, नागफणी आणि परिसरातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे सुंदर दर्शन घडते.

Kothaligad Fort

|

Sakal

मुंबईचे जुने नाव काय होते? जाणून घ्या शहराचा इतिहास!

Old Name of Mumbai

|

Sakal

येथे क्लिक करा