मुंबईचे जुने नाव काय होते? जाणून घ्या शहराचा इतिहास!

Aarti Badade

मुंबई

आजची गजबजलेली मुंबई पूर्वी बॉम्बे या नावाने प्रसिद्ध होती; मात्र या शहराला इतिहासात आणखी काही नावेही होती.

Old Name of Mumbai

|

Sakal

मुंबई नावाचा संबंध मुंबादेवीशी!

स्थानिक कोळी समाजाची आराध्य देवता मुंबादेवी आणि ‘आई’ या शब्दावरून ‘मुंबई’ हे नाव प्रचलित झाल्याचे मानले जाते.

Old Name of Mumbai

|

Sakal

पोर्तुगीजांनी दिले होते वेगळे नाव!

पोर्तुगीज राजवटीत या बेटसमूहाला ‘बॉम बाहीया’ किंवा ‘बॉम्बेम’ असे म्हटले जात असे. या नावाचा अर्थ ‘सुंदर खाडी’ असा होतो.

Old Name of Mumbai

|

Sakal

बॉम्बे नाव कसे पडले?

पोर्तुगीज नावाचे इंग्रजी रूपांतर होऊन ‘बॉम्बे’ हे नाव रूढ झाले. ब्रिटिशांच्या काळात या नावाला अधिकृत ओळख मिळाली.

Old Name of Mumbai

|

Sakal

मुंबईचा इतिहास आहे सात बेटांचा!

मुंबईचा प्रदेश पूर्वी सात बेटांचा समूह होता. येथे कोळी समाजाचे वास्तव्य होते आणि मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता.

Old Name of Mumbai

|

Sakal

पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांकडे सत्ता!

१५३४ मध्ये पोर्तुगीजांनी हा प्रदेश ताब्यात घेतला. पुढे १६६१ मध्ये इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याला विवाहानंतर हुंड्यात ही बेटे मिळाली आणि १६६८ मध्ये ती ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने देण्यात आली.

Old Name of Mumbai

|

Sakal

१९९५ मध्ये झाले मुंबईचे नामांतर!

१ मे १९६० रोजी मुंबई महाराष्ट्राची राजधानी बनली. त्यानंतर १९९५ मध्ये ‘बॉम्बे’ या नावाऐवजी अधिकृतपणे ‘मुंबई’ हे नाव स्वीकारण्यात आले.

Old Name of Mumbai

|

Sakal

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते?

Chhatrapati Shivaji Maharaj Sword Name

|

Sakal

येथे क्लिक करा