श्रीकृष्णाने रुख्मिणीला पळवून नेलं तो भुयारी मार्ग महाराष्ट्रातच…भाविकांची वाढतेय गर्दी

Shubham Banubakode

श्रीकृष्णाची सारसवाडी

विदर्भातील अमरावती जिल्ह्यात असलेलं कौंडण्यपूर भगवान श्रीकृष्णाची सारसवाडी असल्याचं मानलं जातं.

Koundanyapur: Ancient Site Linked to Rukmini Haran

|

esakal

विदर्भ देशाची राजधानी

महाभारत काळात हेच कौंडण्यपूर विदर्भ देशाची राजधानी होती. कौंडण्यपूरमधूनच श्रीकृष्णाने रुख्मिणीचं हरण केलं, अशी आख्यायिका आहे.

Koundanyapur: Ancient Site Linked to Rukmini Haran

|

esakal

प्राचीन मंदिर

या गावाला २५०० वर्ष जुना इतिहास आहे. याच ठिकाणी विठ्ठल रुख्मिणीचं प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात अंबादेवाचीदेखील मुर्ती आहे.

Koundanyapur: Ancient Site Linked to Rukmini Haran

|

esakal

कसं पोहोचायचं?

कौंडण्यपूर हे वर्धा जिल्ह्यात असून अमरावती हे जवळचं प्रमुख शहर आहे. जवळचं विमानतळ नागपूर असून रेल्वे स्टेशन धामणगाव रेल्वे आहे.

Koundanyapur: Ancient Site Linked to Rukmini Haran

|

esakal

कार्तिक महिन्यात यात्रा

कार्तिक महिन्यात येथे मोठी यात्रा भरते.या यात्रेसाठी दूरदूरून भाविक दर्शनासाठी येतात. येथूनच वर्धा नदी देखील वाहते.

Koundanyapur: Ancient Site Linked to Rukmini Haran

|

esakal

रुख्मिणी हरण

एक आख्यायिकानुसार श्रीकृष्णाने विदर्भ राजकन्या रुक्मिणीला येथील अंबादेवीच्या मंदिरात देवीची ओटी भरण्यास बोलावले. तेथूनच जवळच्या भुयारी मार्गाने तिचे हरण केले.

Koundanyapur: Ancient Site Linked to Rukmini Haran

|

esakal

इतिहासातील नोंद

त्या वेळी झालेल्या घनघोर युद्धात रुक्मिणीचा भाऊ रुख्मी व शिशुपालाचा दारुण पराभव झाला, अशी नोंद इतिहासात आहे.

Koundanyapur: Ancient Site Linked to Rukmini Haran

|

esakal

मंदिरातील भुयार

येथील मंदिरातील अंबामातेची मूर्ती अत्यंत तेजस्वी आहे. देवीच्या उजव्या बाजूला पूर्वी भुयार असल्याचे सांगतात. याच भुयारातून रुक्मिणीचे हरण केले, असे म्हटले जाते.

Koundanyapur: Ancient Site Linked to Rukmini Haran

|

esakal

अंबादेवी मंदिरातही भुयार

याशिवाय अमरावती येथील अंबा, एकवीरा मंदिरातही एक भुयार आहे व तेथून तिचे हरण केले, अशीही आख्यायिका आहे.

Koundanyapur: Ancient Site Linked to Rukmini Haran

|

esakal

मातीच्या हंडीतील टेस्टी भाजी खायचीय? विदर्भातील 'या' यात्रेला एकदा तरी भेट द्या...

Bahiram Yatra Vidarbha Travel Guide

|

esakal

हेही वाचा -