Monika Shinde
जन्माष्टमीला श्रीकृष्णाला '५६ भोग' अर्पण करण्याची परंपरा आहे. ही परंपरा केवळ धार्मिक नाही, तर भक्ती आणि भावनांचं प्रतीक आहे. पण यामागचं कारण काय?
गोकुळात एकदा सात दिवस मुसळधार पाऊस झाला. इंद्राच्या रागामुळे गाव जलमय झालं. तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून सगळ्यांचं रक्षण केलं.
या सात दिवसांत श्रीकृष्णाने स्वतः काहीच खाल्लं नाही. तो अखंडपणे गावकऱ्यांसाठी पर्वत धरून उभा राहिला. त्याचा हा त्याग लोक विसरले नाहीत.
पाऊस थांबल्यावर, गावकऱ्यांनी श्रीकृष्णाला त्यांच्या प्रेमाने भरलेल्या अन्नाचा नैवेद्य दिला. प्रत्येक दिवशीचे ८ प्रकार, अशा एकूण ५६ पदार्थ बनवण्यात आले.
तेव्हापासून '५६ भोग' अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली. हे केवळ अन्न नव्हे, तर भक्ती, प्रेम आणि कृतज्ञतेची गाथा आहे.
या नैवेद्यात लाडू, श्रीखंड, पेढे, खीर, दही, पुरणपोळी, फळं, दूध, विविध मिठाया आणि फराळाचे प्रकार असतात. सर्व काही श्रद्धेने बनवलेलं असतं.
जन्माष्टमीला ५६ भोग अर्पण करणं म्हणजे केवळ परंपरा नव्हे, तर भक्तीचा साक्षात उत्सव आहे. ही कथा भक्त आणि भगवान यांच्यातील प्रेमाचं प्रतीक आहे.