Monika Shinde
श्रीकृष्णाला कुणी ‘कान्हा’, ‘लल्ला’, तर कुणी ‘नटखट कृष्ण’ या गोंडस नावांनी ओळखतं. त्याचबरोबर या सर्व नावांमध्ये एक नाव खूप प्रसिद्ध आहे ‘माखनचोर’! पण त्यांना हे नाव का मिळालं? चला, तर मग जाणून घेऊया
श्रीकृष्णाचं बालपण गोकुळात गेलं. तिथं तो खूप नटखट होता, पण त्याचा प्रत्येक खेळ निरागस आणि साऱ्यांच्या मनाला भिडणारा असायचा.
कृष्णाला लहानपणी दही, दूध आणि लोणी खूप आवडायचं. गोपींच्या घरांमधील मटक्यांमधून तो लोणी चोरून खायचा आणि मित्रांनाही वाटायचा.
गोपिका कृष्णाच्या खोड्यांनी त्रस्त होऊन यशोदेच्याकडे तक्रार करत. पण यशोदाही त्याच्या निरागसतेपुढे काहीच करू शकत नसे.
कृष्ण आणि त्याचे मित्र घराच्या छपरावर लटकवलेल्या मटक्यांना काठीने फोडत. लोणी चोरून खाणं हे त्यांचं एक गमतीशीर ‘अभियान’च असायचं.
या लोणी चोरीच्या गोड बाललीलांमुळे कृष्णाला ‘माखनचोर’ हे गोंडस आणि प्रेमळ नाव मिळालं, जे आजही भक्तांच्या ओठांवर आहे.
कृष्णाच्या या लीलांमधून केवळ खोडसाळपणा नव्हे, तर प्रेम, वाटून देणं आणि आनंद यांचे संदेशही दडलेले होते.