सकाळ डिजिटल टीम
बॉलीवूडची प्रतिभावान अभिनेत्री क्रिती सेननने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे.
सुंदरता, सहज अभिनय आणि कामासाठी झोकून देण्याच्या वृत्तीमुळे ती नेहमीच चर्चेत राहते. मात्र क्रिती सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
तिने अलीकडील मुलाखतीत चित्रपट प्रमोशनमुळे येणाऱ्या मानसिक ताणाचा उल्लेख केला.
तिच्या या अनुभवाने चाहत्यांसमोर चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरच्या पाठीमागील कठोर वास्तव समोर आले आहे.
एका वर्षात तीन-चार चित्रपटांचे प्रमोशन आणि सतत प्रवास यामुळे शारीरिक व मानसिक थकवा जाणवतो.
थकव्यामुळे रिॲलिटी शोच्या शूटिंगवेळी व्हॅनिटी व्हॅनमध्ये अस्वस्थता आणि अचानक अश्रू आले हा अनुभव तिने शेअर केला.
क्रिती सेननने स्पष्ट केले की, “जेव्हा एखादं काम तुम्हाला आनंद देतं, तेव्हा त्यात ताण जाणवत नाही. मात्र जेव्हा काम केवळ कर्तव्य म्हणून केलं जातं, तेव्हा त्याचा मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो.’’
क्रितीच्या या वक्तव्यानं अनेक कलाकारांच्या आयुष्याचे धडे प्रेक्षकांसमोर आले आहेत.