Anuradha Vipat
मराठीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीत क्षिती जोगनं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आता क्षितीनं नुकतंच एका मुलाखतीमध्ये मंगळसूत्र घालण्याबाबत स्पष्ट मत मांडलं आहे.
एका युट्यूब चॅनलच्या ‘वूमन की बात’ या कार्यक्रमात क्षिती सहभागी झाली होती.
क्षिती म्हणाली, “मी कुठेतरी गेले होते. तेव्हा मी मंगळसूत्र घातलं नव्हतं. यावर तू मंगळसूत्र नाही घातलं? तुझं नुकतंच लग्न झालंय ना? असं तिली लोक विचारायला लागले.
पुढे बोलताना क्षिती म्हणाली मला काय फरक पडतोय. म्हणजे ते घातल्याने काय होणार आहे? मला मंगळसूत्र खूप आवडतं. तो खूप सुंदर दागिना आहे
पुढे बोलताना,मंगळसूत्र घालायचं की नाही ते माझ्या मनावर आहे. मला माहिती आहे. माझं लग्न झालंय. मंगळसूत्र घातलं काय किंवा न घातलं काय फारक पडतो असंही क्षिती म्हणाली