विनयन वाघमारे
महाराष्ट्रात अनेक प्राचीन लेणी आहेत, पण कुडा लेणी ही एकमेव अशी लेणी आहे जिथून थेट अरबी समुद्र आणि मांडवी खाडीचे विहंगम दर्शन घडते!
Kuda Caves
Sakal
रायगडच्या म्हाडद गावात वसलेली ही लेणी हजारो वर्षांपासून कोकणच्या या सागरी पटलावर उभी आहेत. प्राचीन काळातील जलमार्गांचा हा एक महत्त्वाचा साक्षीदार आहे.
Kuda Caves
Sakal
जेव्हा तुम्ही या प्राचीन लेण्यांच्या वरच्या स्तरावर उभे राहता, तेव्हा समोर पसरलेला निळाशार समुद्र, खारफुटीची जंगले आणि थंडगार वाऱ्याची झुळूक मन जिंकून घेते.
Kuda Caves
Sakal
येथे एकूण २६ बौद्ध लेणी आहेत. चैत्यगृह (प्रार्थना स्थळ) आणि विहारांची रचना इतकी शांत आहे की, पाठीमागे घुमणारा समुद्राच्या लाटांचा आवाज मनाला वेगळीच अनुभूती देतो.
Kuda Caves
Sakal
येथील भिंतींवर ब्राह्मी लिपीतील शिलालेख आणि सुंदर मानवी शिल्पे कोरलेली आहेत, जी तत्कालीन समृद्ध व्यापारी संस्कृतीची साक्ष देतात.
Kuda Caves
Sakal
या लेण्यांपर्यंत पोहोचण्याचा ट्रेक अतिशय सुंदर आहे. वाटेत कोकणातील निसर्ग आणि वर पोहोचल्यावर मिळणारे समुद्राचे दर्शन हा एक परफेक्ट वीकेंड प्लॅन आहे.
Kuda Caves
Sakal
ऑक्टोबर ते मार्च दरम्यान या महाराष्ट्राच्या एकमेव सागरी लेण्यांना आवर्जून भेट द्या आणि हा अनोखा अनुभव घ्या!
Kuda Caves
Sakal
Laugh
Sakal