कुलधरा गाव खरंच Haunted आहे का? रातोरात का ओसाड झालं गाव?

Varsha Balhe

कुलधरा गाव खरंच Haunted आहे का?

राजस्थानमधील कुलधरा गाव आज ‘Haunted Village’ म्हणून प्रसिद्ध आहे. पण खरंच या गावात भूतं असल्याचा काही पुरावा आहे का?

Kuldhara Village Haunted

|

esakal

कधी वसलं होतं कुलधरा?

कुलधरा गाव पालीवाल ब्राह्मणांनी १२९१ मध्ये वसवल्याचं राजस्थान पर्यटन सांगतं. एकेकाळी हे वाळवंटातील समृद्ध आणि गजबजलेलं गाव होतं.

Kuldhara Village Haunted

|

esakal

ओसाड कसं झालं?

१९व्या शतकाच्या सुरुवातीला कुलधरा आणि आसपासची पालीवाल वस्ती मोठ्या प्रमाणात ओसाड झाली. पण नेमकं कारण आजही निश्चितपणे समोर आलेलं नाही.

Kuldhara Village Haunted

|

esakal

सलीम सिंहची रहस्यमय कथा

लोककथेनुसार मंत्री सलीम सिंहला गावच्या मुखियाच्या मुलीशी लग्न करायचं होतं. त्याच्या दबावामुळे गावकऱ्यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला, असं सांगितलं जातं.

Kuldhara Village Haunted

|

esakal

शाप

प्रचलित आख्यायिकेनुसार गाव सोडताना पालीवालांनी कुलधरा शापित केलं. ‘यानंतर इथे कोणीही राहू शकणार नाही’, अशी कथा सांगितली जाते.

Kuldhara Village Haunted

|

esakal

मग गाव पुन्हा का वसलं नाही?

काही अभ्यासांनुसार पाण्याची कमतरता, आर्थिक परिस्थिती, करांचा दबाव आणि बदलते व्यापारमार्ग यांसारखी कारणं असू शकतात. म्हणून गाव सोडण्यामागे एकापेक्षा जास्त कारणं असण्याची शक्यता आहे.

Kuldhara Village Haunted

|

esakal

विचित्र अनुभव

कुलधरामध्ये विचित्र आवाज, सावल्या आणि paranormal अनुभवांच्या अनेक कथा सांगितल्या जातात. मात्र स्थानिकांपैकी काही जण अशा भुतांच्या कथा केवळ मिथक असल्याचं सांगतात.

Kuldhara Village Haunted

|

esakal

खरं काय?

कुलधरा ‘Haunted’ म्हणून प्रसिद्ध असलं तरी इथे भूतं किंवा paranormal activity असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही. गावाची ओसाड अवस्था, जुन्या आख्यायिका आणि रहस्यमय वातावरणामुळे त्याला ‘Ghost Village’ अशी ओळख मिळाली आहे.

Kuldhara Village Haunted

|

esakal

शाहजहाँ आणि मुमताजचं लग्न कसं झालं? ५ वर्षं का थांबावं लागलं?

Shah Jahan Mumtaz Marriage

|

esakal

येथे क्लिक करा