शाहजहाँ आणि मुमताजचं लग्न कसं झालं? ५ वर्षं का थांबावं लागलं?

Varsha Balhe

शाहजहाँ आणि मुमताजचं लग्न कसं झालं?

ताजमहाल म्हटलं की शाहजहाँ आणि मुमताजची प्रेमकहाणी आठवते. पण दोघांची पहिली भेट कशी झाली? साखरपुड्यानंतर लग्नासाठी पाच वर्षं का थांबावं लागलं? आणि मुमताज ही शाहजहाँची पहिली पत्नी होती का? जाणून घेऊया...

Shah Jahan Mumtaz Marriage

|

esakal

मुमताजचं खरं नाव

ताजमहालासाठी प्रसिद्ध असलेल्या मुमताजचं खरं नाव अर्जुमंद बानू बेगम होतं. तिचे वडील आसफ खान हे मुघल दरबारातील प्रभावशाली सरदार होते.

Shah Jahan Mumtaz Marriage

|

esakal

पहिली भेट

असं सांगितलं जातं की, शाहजहाँ आणि मुमताज महल यांची पहिली भेट मीना बाजारात झाली होती.

Shah Jahan Mumtaz Marriage

|

esakal

साखरपुडा

पहिल्या भेटीनंतर दोघांचा १६०७ मध्ये साखरपुडा झाला. त्यावेळी अर्जुमंद बानूचं वय सुमारे १४ वर्षं होतं. दोघांचं नातं ठरलं होतं, पण लग्न मात्र लगेच झालं नाही.

Shah Jahan Mumtaz Marriage

|

esakal

मग लग्नासाठी पाच वर्षं का थांबले?

साखरपुडा झाल्यानंतरही दोघांच्या लग्नाला जवळपास पाच वर्षं लागली. ताजमहालच्या अधिकृत माहितीनुसार, विवाहाची तारीख दरबारी ज्योतिषांनी ठरवली होती. या काळात शाहजहाँचा आणखी एक विवाहही झाला होता.

Shah Jahan Mumtaz Marriage

|

esakal

शाही विवाह

अखेर १० मे १६१२ रोजी शाहजहाँ आणि अर्जुमंद बानू यांचा निकाह झाला. त्यावेळी शाहजहाँच वय सुमारे २० वर्षं होतं. विवाहानंतर अर्जुमंद बानूला ‘मुमताज महल’ ही उपाधी मिळाली.

Shah Jahan Mumtaz Marriage

|

esakal

मुमताज शाहजहाँची पहिली पत्नी होती का?

मुमताज ही शाहजहाँची पहिली पत्नी नव्हती. तिच्याआधी त्याचा कंदाहारी बेगमशी विवाह झाला होता. मात्र ऐतिहासिक नोंदींनुसार मुमताजला शाहजहाँच्या आयुष्यात विशेष स्थान होतं. ती त्याची जवळची सहचारिणी आणि विश्वासू व्यक्ती होती.

Shah Jahan Mumtaz Marriage

|

esakal

मुघल बादशहांना जेवणातून विष दिलं जायचं? काय सांगतो इतिहास?

Mughal emperors' food poisoning

|

Sakal

येथे क्लिक करा