सकाळ डिजिटल टीम
कुंभमेळ्याची सुरूवात कुणी केली? जाणून घ्या सविस्तर माहिती.
Kumbh Mela
sakal
कुंभमेळ्याची सुरुवात एका व्यक्तीने केलेली नाही, तर त्याला पौराणिक आधार आहे आणि त्याला संघटित रूप एका महान संताने दिल्याचे म्हंटले जाते.
Kumbh Mela
sakal
कुंभमेळ्याची कल्पना ही समुद्रमंथन आणि त्यातून निघालेला अमृतकलश यांच्या कथेवर आधारित अल्याची मान्यता आहे.
Kumbh Mela
sakal
पौराणिक मान्यतेनुसार, अमृतकलश मिळवण्यासाठी देव (देवता) आणि दानव (असुर) यांच्यात संघर्ष झाला, ज्यामुळे अमृताचे थेंब पृथ्वीवर पडले.
Kumbh Mela
sakal
हे अमृत बिंदू पृथ्वीवरील ज्या चार ठिकाणी पडले, त्या ठिकाणी कुंभपर्वाची सुरुवात झाली.
Kumbh Mela
sakal
या पौराणिक कथेनुसार, कुंभमेळ्याच्या संकल्पनेची सुरुवात मानवाने नाही, तर देव आणि दानवांनी केली आहे.
Kumbh Mela
sakal
आदि शंकराचार्यांनी हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि साधूंना एकत्र आणण्यासाठी 'दशनामी संप्रदायातील अखाड्यांची' स्थापना केली.
Kumbh Mela
sakal
या अखाड्यांना कुंभमेळ्यात सामील करून त्यांना 'शाही स्नानाचा' मान देण्याची परंपरा शंकराचार्यांनी सुरू केली.
Kumbh Mela
sakal
शंकराचार्यांनी कुंभमेळ्याला केवळ धार्मिक स्नान पर्व न ठेवता, तो विविध संप्रदायांना एकत्र आणणारा संघटित महासोहळा बनवला.
Kumbh Mela
sakal
shivaji maharaj photo
esakal