Mansi Khambe
स्मृती इराणी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतणार आहेत. स्मृती इराणी पुन्हा एकदा एकता कपूरच्या 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेत काम करताना दिसणार आहेत.
स्मृती इराणी पुन्हा एकदा त्यांच्या राजकीय कारकिर्दीपासून दूर अभिनय करताना दिसणार आहेत. स्मृती इराणी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय जनता पक्षातून केली.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अमेठीमधून निवडणूक लढवली आणि राहुल गांधी यांचा पराभव केला. याआधी स्मृती इराणी २०११ ते २०१९ पर्यंत राज्यसभेच्या सदस्या राहिल्या आहेत.
स्मृती इराणी यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे ८ कोटी ८३ लाख रुपयांची मालमत्ता आहे. स्मृती इराणीचा लूक समोर आला आहे. यामध्ये त्या जुन्या स्टाईलमध्ये दिसत आहेत.
त्यांच्या या लूकमुळे चाहत्यांच्या जुन्या आठवणीही ताज्या झाल्या आहेत. चाहते खूप आनंदी दिसत आहेत. कारण जेव्हा त्या 'सास भी कभी बहू थी' या शोमध्ये आल्या तेव्हा ती त्यांच्या करिअरची सुरुवात होती.
त्यावेळी त्या २४ वर्षांची होत्या. आता त्या ४९ वर्षांच्या आहे. पण तुलसीच्या लूकमध्ये अभिनेत्रीची स्टाईल तसाच दिसत आहे. त्या मरून रंगाच्या सोनेरी प्रिंटेड साडीत दिसत आहे.
अभिनेत्रीने सिंदूर लावला आहे आणि तुलसीच्या लूकमध्ये बांगड्या घातल्या आहेत. यासोबतच अभिनेत्रीने चांदीच्या रंगाचा हार आणि त्याच रंगाचे जुळणारे कानातले घातले आहेत.
त्यांनी काळ्या धाग्यात मंगळसूत्र बांधले आहे जे त्यांच्या लूकला एक अनोखा स्पर्श देत आहे. अभिनेत्री तुलसीच्या लूकमध्ये हसताना दिसत आहे.