Vinayan
निसर्गाशी अगदी समरस होऊन जगण्याची लडाखची ही पारंपरिक वास्तुकला थक्क करणारी आहे. कधी पाहिली आहे का ही रचना?
Ladakhi traditional
Sakal
लडाखमध्ये कडाक्याची थंडी आणि कडक उन्हाळा असे दोन्ही ऋतू टोकाचे असतात. तिथल्या लोकांनी त्यावर अत्यंत सुंदर असा वास्तुकलेचा मार्ग शोधला आहे.
Ladakhi traditional
Sakal
'चांसा' हे लडाखी घरामधील हिवाळ्यातील विशेष स्वयंपाकघर असते. घरातील मध्यवर्ती चूूल (थब) सतत पेटती ठेवून संपूर्ण घर उबदार ठेवले जाते.
Ladakhi traditional
Sakal
कडाक्याच्या थंडीत बाहेरील तापमान उणे अंकात असताना, घरातील सर्वजण या 'चांसा'मध्ये एकत्र बसून जेवण करतात आणि गप्पा मारतात.
Ladakhi traditional
Sakal
हिवाळ्यानंतर उन्हाळ्यात राहण्यासाठी मोठ्या आणि श्रीमंत घरांमध्ये 'यारखांग' नावाची विशेष खोली असते, जिथे खिडक्यांमधून येणारी हवा गारवा देते.
Ladakhi traditional
Sakal
ही घरे सिमेंटची नसून नैसर्गिक माती, दगड आणि मजबूत लाकडापासून बनवली जातात, ज्यामुळे घरातील तापमान ऋतुमानानुसार नियंत्रित राहते.
Ladakhi traditional
Sakal
या घरांच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि पेटणाऱ्या चुलीच्या ज्योतीत तिथल्या लोकांच्या कष्टाची, धैर्याची आणि संस्कृतीची साक्ष दडलेली असते.
Ladakhi traditional
Sakal
आधुनिकतेच्या युगातही आपल्या मुळांना आणि पारंपारिक वास्तुकलेला जपणाऱ्या लडाखच्या या जीवनशैलीला खरोखरच विशेष आहे!
Ladakhi traditional
Sakal
Vasantgad Fort
Sakal