सकाळ डिजिटल टीम
आयपीएलचा १८ वा हंगाम अवघ्या ८ दिवसांवर येऊन ठेपला आहे. २२ मार्चपासून आयपीएलच्या रणधुमाळीला सुरूवात होणार आहे.
यंदाची लीग गाजवण्यासाठी सर्वच संघांनी कंबर कसली आहे.
पण आयपीएलमधील या संघांच्या मालकिण बाई कोण आहेत? तुम्हाला माहित आहे का?
आयपीएलमधील यशस्वी संघ मुंबई इंडियन्स हा उद्योगपती मुकेश अंबानींच्या पत्नी निता अंबानी यांच्या मालकिचा आहे. हार्दिक पांड्या हा मुंबईचा सध्याचा कर्णधार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा या पंजाब किंग्ज संघाच्या मालकिण आहेत. कर्णधार श्रेयस अय्यरला पंजाबने यावेळी २६.७५ कोटींमध्ये करारबद्ध केले.
आई जूही चावला व मुलगी जानव्ही मेहता या केकेओर संघाच्या सह-संघमालक आहेत. यंदा मराठमोळा अजिंक्य रहाणे केकेआर संघाची सुत्रे हाती घेणार आहे.
सन ग्रुपचे चेअरमन कलानिथी मरान यांची कन्या काव्या मरान सनरायझर्स हैद्राबाद संघाची मालकिण आहे. पॅट कमिन्स एसआरएचचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे.