Saisimran Ghashi
मार्च महिना आला तरी फेब्रुवारी महिन्यातील लाडक्या बहिणीचा हप्ता जमा झालेला नाही.
महिला वर्गातून यावर नाराजी व्यक्त केली जात आहे कारण लाखो महिलांना अपात्र ठरवले गेले गेले आहे.
राज्याच्या वित्त विभागाकडून महिला आणि बालविकास विभागाला आठव्या हप्त्यासाठी ३४९० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
ladki bahin maharashtra new rules
फेब्रुवारीचा हप्ता दोन दिवसांपूर्वी मिळणार होता, पण तांत्रिक कारणांमुळे तो होऊ शकला नाही.
डिसेंबर २०२३ मध्ये २ कोटी ४६ लाख महिलांना लाभ मिळाला, तर फेब्रुवारीमध्ये ही संख्या २ कोटी ३७ लाखांपर्यंत कमी झाली आहे.
८३% विवाहित महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळत आहे.
सत्तेत आल्यानंतर राज्य सरकारने लाभार्थ्यांचा आढावा घेऊन पाच लाख महिलांची नावे वगळली आहेत, आणि भविष्यात ही संख्या १५ लाखांपर्यंत पोहोचू शकते.
ज्या महिलांना योजनेअंतर्गत पैसे मिळाले आहेत, त्यांच्याकडून कोणतीही रक्कम परत घेतली जाणार नाही, परंतु भविष्यात फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल.
कदाचित सोमवार ३ मार्चपासून लाडक्या बहिणीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होऊ शकते.