Saisimran Ghashi
टॉन्सिल्स म्हणजे घशाच्या दोन्ही बाजूंना असलेले लहानसे गाठीसारखे टिश्यू असतात. ते प्रतिकारशक्तीचा एक भाग असून, शरीरात जंतूंविरुद्ध लढण्याचे काम करतात.
मात्र, टॉन्सिल्सला संसर्ग (टॉन्सिलायटिस) झाल्यास घसा दुखणे, गिळताना त्रास होणे, ताप आणि आवाज बसणे यासारखी लक्षणे दिसू शकतात.
टॉन्सिल्सचा त्रास असणाऱ्या लोकांनी कोणते पदार्थ टाळावे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
आईसक्रिम, कोल्ड ड्रिंक्स, शीतपेये, थंड दूध आणि फ्रिजमधून लगेच काढलेले पदार्थ खाणे टाळा.
समोसे, वडा-पाव, भाजी, चिप्स आणि फास्ट फूड खावू नयेत.
मिरची, मसालेदार भाज्या, लोणचे आणि चटणी खाणे टाळावे.
संत्री, मोसंबी, लिंबू, दही आणि आंबट ताक खावू नये.
हे पदार्थ खाल्ल्यास तुमचे टॉन्सिल वाढून जास्त त्रास होऊ शकतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.