बैलानं मालकाला जिंकून दिली फॉर्च्युनर, लखनचा खुराक काय आणि खरेदी किंमत किती?

सूरज यादव

लखनचा दबदबा

गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील करोडी (ता. गंगापूर) येथील सर्जेराव चव्हाण आणि मनोहर चव्हाण या भावंडांच्या लखन बैलानं बैलगाडा क्षेत्रातील पश्चिम महाराष्ट्राची मक्तेदारी मोडीत काढली.

Bull Lakhan Wins Fortuner Car

|

Esakal

फॉर्च्युनर जिंकली

लखनने २०० हून अधिक स्पर्धांमध्ये बक्षीस पटकावलंय. सांगलीत ‘श्रीनाथ केसरी’मध्ये त्याने मालकासाठी फॉर्च्युनर कारचे बक्षीस पटकावले. त्याला साथ मिळाली ती दांडेगाव (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथील साईनाथ कराळे यांच्या ‘सर्जा’ची.

Bull Lakhan Wins Fortuner Car

|

Esakal

श्रीनाथ केसरीत प्रथम क्रमांक

सांगलीत ‘श्रीनाथ केसरी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत’ झाली. यात तब्बल १,२१० बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेत करोडी येथील ‘ट्रिपल केसरी लखन’ आणि दांडेगाव येथील ‘सर्जा’ या जोडीने वाऱ्याच्या वेगाने धावत प्रथम क्रमांक पटकावला.

Bull Lakhan Wins Fortuner Car

|

Esakal

कार, गदा अन् दुचाकी

श्रीनाथ केसरी स्पर्धेत विजेत्या जोडीला फॉर्च्युनर कार, मानाची चांदीची गदा आणि दुचाकीचे बक्षीस प्रदान करण्यात आले. या विजयात धुरकरी किशोर कदम यांनी कौशल्याचा कस दाखवला.

Bull Lakhan Wins Fortuner Car

|

Esakal

‘लखन’ची कामगिरी आणि विक्रम

‘लखन’ने महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातल्या स्पर्धांतही यश मिळवलंय. देशातील सर्वाधिक अंतर प्रवास करणारा ‘ट्रिपल केशरी बैल’ म्हणून त्याची नोंद झालीय. लखनने ५१ हजार ते ११ लाख रुपयांपर्यंतची तब्बल ११० हून अधिक बक्षिसे आणि १५ दुचाकी बक्षिसे अशी २०० पेक्षा अधिक बक्षिसे पटकावली आहेत.

Bull Lakhan Wins Fortuner Car

|

Esakal

खुराक काय?

रोज सकाळ-संध्याकाळ ‘लखन’च्या देखभालीसाठी अविनाश चव्हाण, सोमीनाथ नवले आणि मनोहर चव्हाण हे तत्पर असतात. त्याला रोज पाच लिटर गीर गायीचे दूध, गावरान कोंबडीची पाच अंडी, बदाम-काजू आणि पाच प्रकारचे कडधान्य, हिरवा आणि सुका चारा दिला जातो.

Bull Lakhan Wins Fortuner Car

|

Esakal

Bull Lakhan Wins Fortuner Car11 लाखांची खरेदी

चव्हाण बंधूंनी तीन वर्षांपूर्वी कराळा (जि. जालना) येथील गजानन काळे यांच्याकडून ‘लखन’ला ११ लाख ५१ हजारांमध्ये विकत घेतले होते. त्यानंतर नियोजनपूर्वक प्रशिक्षण देत त्यांनी त्याला ‘ट्रिपल केशरी’ बनवले.

Bull Lakhan Wins Fortuner Car

|

Esakal

हेलिकॉप्टर बैज्या नाव कसं पडलं, कितीला खरदे अन् काय असतो खुराक?

Helicopter Baijya Name, Price and Diet

|

Esakal

इथं क्लिक करा