kimaya narayan
मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच काही ना काही कारणाने चर्चेत असतात.
सुंदर अभिनेत्री म्हणून त्यांची इंडस्ट्रीत ओळख आहे. त्यांचे बोल्ड फोटोजही कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात.
त्याचबरोबर त्याचे पती आणि अभिनेते अविनाश नारकर यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. तर सोशल मीडियावर त्यांचे डान्स रील गाजतात. पण ऐश्वर्या यांच्या होणाऱ्या सुनेला तुम्ही पाहिलं आहेत का ?
हो ! ऐश्वर्या नारकर लवकरच सासूबाई होणार आहेत. त्यांच्या होणाऱ्या सुनेने नात्याची कबुली नुकतीच सोशल मीडियावर दिली. ऐश्वर्या यांची होणारी सून आहे अभिनेत्री ईशा संजय.
नुकतंच ईशाने आस्क मी नाऊवरून चाहत्यांशी संवाद साधला त्यावेळी तिला एकाने तुमचं लग्न झालं आहे का? असा प्रश्न विचारला त्यावर तिने अमेयबरोबरचा फोटो शेअर करत "नाही. कारण कोणीतरी खूप दूर आहे सध्या" असं उत्तर दिलं.
ईशा सध्या झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा या मालिकेत काम करतेय. या मालिकेत ती साकारत असलेली राजश्रीची भूमिका अनेकांना आवडते.
ईशा आणि अमेय अनेक वर्षं एकमेकांना डेट करत आहेत. ते एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. लवकरच ते लग्न करणार आहेत.
अमेय सध्या अभिनयाचं शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेला आहे. तिथून परत आल्यावर कदाचित ही जोडी लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे.