सूरज यादव
गुजरातच्या कच्छमध्ये सिंधू नदीच्या किनारी ओसाड पडलेला लखपत किल्ला आहे. एकेकाळी हा किल्ला समृद्ध असं बंदर होता.
Lakhpat Fort
Esakal
१८०१ मध्ये फतेह मुहम्मदने बांधलेला हा किल्ला व्यापारी बंदर म्हणून प्रसिद्ध होता. पण एका भूकंपाने आता तो ओसाड बनलाय.
Lakhpat Fort
Esakal
लखपत किल्ल्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला भारत-पाकिस्तान सीमेवर शेवटच्या गावात आहे.
Lakhpat Fort
Esakal
भूकंपामुळे लखपत किल्ल्यातील बंदरातून होणारा व्यापार बंद झाला. या किल्ल्यापासून पुढे पाकिस्तानची हद्द सुरू होते.
Lakhpat Fort
Esakal
१८१९मध्ये विध्वंसक भूकंपाने सिंधू नदीची उपनदी असलेली कोरी क्रीकचा प्रवाह बदलला. यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली.
Lakhpat Fort
Esakal
पाण्याअभावी किल्ल्यावरून होणारा व्यापार हळू हळू कमी झाला. एकेकाळी कोट्यधीशांची वस्ती असलेलं श्रीमंत शहर अशी या भागाची ओळख होती.
Lakhpat Fort
Esakal
लखपत किल्ल्याची सुरक्षा भिंत ७ किमी लांब आहे. तर त्या भिंतीची उंची २० फूट इतकी आहे. २४ बुरुज आणि ४ मोठे प्रवेशद्वार या किल्ल्याला आहेत.
Lakhpat Fort
Esakal
किल्ल्याची सध्याची अवस्था ओसाड अशी असून ऐतिहासिक स्थळ म्हणून पर्यटक पाहण्यासाठी येतात.
Lakhpat Fort
Esakal
Sindhudurg Fort
Esakal