सूरज यादव
महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अरबी समुद्रात असलेल्या जलदुर्ग म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला.
Sindhudurg Fort
Esakal
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाला २५ नोव्हेंबर १६६४ रोजी सुरुवात झाली होती. समुद्राच्या लाटा झेलूनही याच्या भिंती आजही दिमाखात उभा आहेत.
Sindhudurg Fort
Esakal
प्रमुख शिल्पकार हिरोजी इंदुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ३,००० हून अधिक कुशल कारागिरांनी हा किल्ला अवघ्या तीन वर्षांत उभारला.
Sindhudurg Fort
Esakal
मजबूत तटबंदी, प्रचंड बुरुज आणि निसर्गाशी एकरूप झालेली रचना यामुळे हा किल्ला अभेद्य बनला होता.
Sindhudurg Fort
Esakal
चारही बाजूने समुद्राने वेढलेला हा किल्ला ऊन, वारा, पाऊस आणि समुद्राच्या अजस्र लाटांचा तडाखा सहन करत गेल्या साडे तीनशे वर्षांपासून अभेद्य राहिलाय.
Sindhudurg Fort
Esakal
किल्ल्याच्या दगडांना घट्ट बसवण्यासाठी त्यावेळी मोठ्या प्रमाणावर शिसे वापरण्यात आले होते. त्यामुळेच किल्ल्याचे बांधकाम भक्कम बनले.
Sindhudurg Fort
Esakal
भरसमुद्रात बांधलेल्या या किल्ल्याच्या पायासाठी दगडांऐवजी शिसे धातूचा वापर केला गेला. ५०० खंडी शिसे ओतण्यात आलं होतं.
Sindhudurg Fort
Esakal
शिसे वापरल्यानं समुद्राचा पाया भक्कम झाला आणि आजही समुद्राच्या भल्यामोठ्या लाटांनाही सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भिंती समर्थपणे तोंड देतायत.
Sindhudurg Fort
Esakal
shivaji maharaj
esakal