संपत्तीची देवी लक्ष्मीची पूजा का करतात? लक्ष्मी पुजनाचे महत्व जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

इतिहास

दिवाळीतला महत्वाचा सण लक्ष्मी पूजन हा सण का साजरा करतात या मागचा इतिहास काय आहे जाणून घ्या.

Lakshmi Puja

|

sakal

सुखाची देवी

अश्विन वद्य अमावस्येला लक्ष्मी पुजन करतात. लक्ष्मी पूजन हा सण प्रामुख्याने धन, समृद्धी, ऐश्वर्य आणि भौतिक सुखाची देवी माता लक्ष्मी हिची पूजा करण्यासाठी साजरा केला जातो.

Lakshmi Puja

|

sakal

विष्णूपत्नी लक्ष्मी

पुराण काळी उदार आणि बलवान अशा बळीराजाने देवतांना आणि प्रत्यक्ष विष्णूपत्नी लक्ष्मी यांना डांबून ठेवले होते.

Lakshmi Puja

|

sakal

वामनावतार

वामनावतार धारण करून विष्णूंनी बळीराजाला पाताळात ढकलून त्याची सर्व संपत्ती लक्ष्मीसह मोकळी केली. म्हणून या दिवशी लक्ष्मीचे पूजन केले जाते.

Lakshmi Puja

|

sakal

धन-संपत्ती

असे मानले जाते की लक्ष्मी पूजन केल्याने धन-संपत्ती, समृद्धी प्राप्त होते. म्हणून या दिवशी सर्व लोक लक्ष्मी पूजन करतात.

Lakshmi Puja

|

sakal

लक्ष्मीची कृपा

या पूजेमुळे घरात स्थिर धन-संपत्ती (चंचल नव्हे) कायम राहावी आणि वर्षभर लक्ष्मीची कृपा राहावी यासाठी प्रार्थना केली जाते.

Lakshmi Puja

|

sakal

कौटुंबिक ऐक्य

हा सण कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र आणतो. एकत्र पूजा, गोड पदार्थ वाटणे यातून कौटुंबिक बंध मजबूत होतात आणि घरात सुख-शांती नांदते.

Lakshmi Puja

|

sakal

विष्णूंचे महत्त्व

लक्ष्मी ही भगवान विष्णूंची अर्धांगिनी आहे. जिथे नारायणाची (विष्णू) पूजा होते, तिथेच लक्ष्मी कायम वास करते, म्हणून पूजेत विष्णूंचेही स्मरण केले जाते.

Lakshmi Puja

|

sakal

सकारात्मक ऊर्जा

घराची स्वच्छता, रोषणाई आणि एकत्रित प्रार्थनेमुळे मानसिक शांतता, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, जी जीवनात यश मिळवण्यासाठी आवश्यक आहे.

Lakshmi Puja

|

sakal

छोटी दिवाळी: नरक चतुर्दशी का साजरी करतात?

Narak Chaturdashi

|

sakal 

येथे क्लिक करा