छोटी दिवाळी: नरक चतुर्दशी का साजरी करतात?

सकाळ डिजिटल टीम

छोटी दिवाळी

नरक चतुर्दशीलाच छोटी दिवाळी असे म्हंटले जाते हा दिवस का साजरा करतात या मागचा इतिहास काय आहे जाणून घ्या.

Narak Chaturdashi

|

sakal 

नरकासुर वध

हा सण प्रामुख्याने भगवान श्रीकृष्णाने आणि त्यांची पत्नी सत्यभामा यांनी अत्याचारी नरकासुर राक्षसाचा वध केल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.

Narak Chaturdashi

|

sakal

राक्षसाचा संहार

भगवान श्रीकृष्णाने सूर्योदयापूर्वी नरकासुर राक्षसाचा संहार केला तो याच दिवशी. असे म्हंटले जते की हा असुर सज्जनांना त्रास देत असे.

Narak Chaturdashi

|

sakal 

नरकासुराची इच्छा

नरकासुराने श्रीकृष्णाजवळ आपली अंतीम इच्छा व्यक्त केली की त्याचा मृत्यु दिवस सर्वत्र दिप लावून साजरा करावा. श्रीकृष्णाने त्याची कामना पूर्ण केली.

Narak Chaturdashi

|

sakal 

अभ्यंग स्नानाची परंपरा

नरकासुर वधानंतर श्रीकृष्ण रक्त आणि मातीने माखले होते. सत्यभामेने त्यांना शुद्ध करण्यासाठी सुगंधित तेलाचे स्नान (अभ्यंग स्नान) घातले, म्हणून या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नानाची प्रथा आहे.

Narak Chaturdashi

|

sakal

पापमुक्ती

अशी धार्मिक श्रद्धा आहे की, नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान केल्याने मनुष्याला नरकात जाण्यापासून मुक्ती मिळते आणि त्याला पुण्य प्राप्त होते.

Narak Chaturdashi

|

sakal 

यमदीपदान

या दिवशी सायंकाळी यमराजाला उद्देशून दिवे लावले जातात (यमदीपदान). अकाली मृत्यू टळावा आणि कुटुंबाचे रक्षण व्हावे यासाठी ही पूजा केली जाते.

Narak Chaturdashi

|

sakal 

दिवाळीचा भाग

नरक चतुर्दशी हा पाच दिवसांच्या दिवाळी उत्सवातील दुसरा महत्त्वाचा दिवस आहे, जो मोठा सण सुरू होण्यापूर्वी शुद्धता आणि आनंदाचे प्रतीक मानला जतो.

Narak Chaturdashi

|

sakal 

नैवेद्य

या दिवशी सर्वत्र दिव्यांचा झगमगाट करवा. देवाला शेवयांची खीर किंवा गव्हाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी व त्यानंतर इष्टमित्रांसह फराळ करावा.

Narak Chaturdashi

|

sakal 

दिवाळीचा खास विधी! नरक चतुर्दशीला कारिट फळ का फोडले जाते?

Karit Phala Ritual

|

Sakal

येथे क्लिक करा