तो क्षण आला... ! लालबागच्या राजाचा भावूक निरोप, पाहा विसर्जनाचे खास क्षण

Mansi Khambe

गणेशोत्सव

१२ दिवस गणेशोत्सव साजरा केल्यानंतर अखेर शुक्रवार (ता.२५ सप्टेंबर) रोजी अनंत चतुर्थीदिवशी गणरायाचे विसर्जन करण्यात आले.

Lalbaugcha Raja Visarjan Photos

|

ESakal

विसर्जन सोहळा

ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करत भक्तिमय वातावरणात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात विराजमान गणरायाला निरोप देण्यात आला.

Lalbaugcha Raja Visarjan Photos

|

Esakal

लालबागचा राजा

मुंबईतील सर्वात लोकप्रिय सार्वजनिक गणेशोत्सव असलेल्या 'लालबागच्या राजा'चं देखील विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे.

Lalbaugcha Raja Visarjan Photos

|

ESakal

सांस्कृतिक वारसा

लालबागचा राजा हा मुंबईचा सांस्कृतिक वारसा आहे. त्याच्या विसर्जनाला लाखो लोकांचे भावविश्व जोडलेले आहे.

Lalbaugcha Raja Visarjan Photos

|

ESakal

विसर्जन सोहळा संपन्न

शुक्रवार दुपारी १ वाजण्याच्या सुमारास लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाल्यानंतर आज शनिवार सकाळी १०:४५ वाजेच्या सुमारास विसर्जन सोहळा संपन्न झाला.

Lalbaugcha Raja Visarjan Photos

|

ESakal

भाविकांची गर्दी

यावेळी लालबागच्या राजाचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी केली होती.

Lalbaugcha Raja Visarjan Photos

|

ESakal

शेवटचा क्षण

लाडक्या बाप्पाला निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले होते. तसेच यावेळी अनंत अंबानी देखील लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर उपस्थित होते.

Lalbaugcha Raja Visarjan Photos

|

ESakal

राजाला निरोप

लालबागच्या राजाचा विजय असो, ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात आपल्या लालबागच्या राजाला गणेश भक्तांनी निरोप दिला आहे.

Lalbaugcha Raja Visarjan Photos

|

ESakal

पाण्याच्या बाटलीचा तळ सपाट, मग शीतपेयांच्या बाटल्यांचा तळ पाच-कोनी का असतो?

Water Bottle And Soft Drink Bottle Design

|

ESakal

येथे क्लिक करा