Vinayan
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कोकणातील या दुर्गम गावात दाखल झाली 'लालपरी'... गावकऱ्यांच्या डोळ्यात तरळले आनंदाचे अश्रू!
First ST Bus
Sakal
निसर्गाचे सौंदर्य लाभलेले लांजा तालुक्यातील माचाळ हे पर्यटनात पुढे असले, तरी प्रवासाच्या सुविधांच्या बाबतीत हा परिसर अतिशय मागे होता.
First ST Bus
Sakal
स्वातंत्र्याची ७७ वर्षे लोटली, तरी गावात एसटी बस आलीच नव्हती. शिक्षणासाठी किंवा बाजारासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांना मैलोन्मैल पायपीट करावी लागे.
First ST Bus
Sakal
गावात वाहन सुविधा नसल्याने गर्भवती महिला किंवा गंभीर आजारी व्यक्तींना उपचारासाठी डोली वा झोळीत घालून खाली आणावे लागे. हा रोजचा संघर्ष होता.
First ST Bus
Sakal
गावकऱ्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा अखेर फळाला आला. माचाळच्या मातीत एसटी बसचे चाक पडताच संपूर्ण गावात आनंदाची लाट उसळली.
First ST Bus
Sakal
गावात पहिल्यांदाच आलेल्या एसटी बसच्या चालक आणि वाहकाचे ग्रामस्थांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि पुष्पहार घालून औक्षण केले.
First ST Bus
Sakal
या बस सेवेमुळे आता शाळेत जाणारी मुले, कॉलेजचे तरुण आणि नोकरी निमित्त बाहेर जाणारे ग्रामस्थ यांचा जीवघेणा प्रवास सुरक्षित झाला आहे.
First ST Bus
Sakal
एका एसटी बसने कशा प्रकारे संपूर्ण गावाचे भाग्य बदलले, याचा हा जिवंत अनुभव आहे. (ही प्रेरणादायी बातमी इतरांपर्यंत नक्की शेअर करा!)
First ST Bus
Sakal
Historical chronicle of the Navy
Sakal