Monika Shinde
कोरोना काळानंतर अनेकांचं दैनंदिन जीवन पूर्णपणे बदललं आहे.
या काळात घरातून काम (Work from Home) करण्याचं प्रमाण वाढलं आहे. आज अनेकजण तासंतासमांडीवर लॅपटॉप ठेवून काम करत असतात. मात्र यामुळे आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. चला, ते जाणून घेऊया.
लॅपटॉप वापरताना त्याचा खालचा भाग खूप गरम होतो. या उष्णतेमुळे त्वचेला जळजळ, लालसरपणा आणि खवखवाट होतो.
याच्या परिणामामुळे "Toasted Skin Syndrome" या नावाचा आजार होऊ शकतो. हा आजार जास्त काळ राहिला तर असाच राहिल्यास कधीकधी कर्करोगात रूपांतर होण्याचा धोका असतो.
या आजाराची लक्षणं अनेक वेळा सुरुवातीला लक्षात येत नाहीत. त्यामुळे त्वचेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.
शास्त्रानुसार, मांडीवर लॅपटॉप ठेवून दीर्घकाळ काम केल्यास शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते. उष्णतेमुळे पुरुषांची प्रजननक्षमता प्रभावित होऊ शकते.
मांडीवर लॅपटॉप ठेवल्यास पाठ व मानेची स्थिती चुकीची होते. यामुळे दीर्घकाळात मानेचा, पाठदुखीचा आणि कंबरेच्या वेदनांचा त्रास होऊ शकतो.
टेबलावर लॅपटॉप ठेवा. शक्य असल्यास लॅपटॉप स्टँड वापरा. आणि चांगल्या पोश्चरमध्ये बसा. दर १ तासाने ५ मिनिटाचा ब्रेक घ्या.