बाळकृष्ण मधाळे
ग्रामीण भागात टिटवी पक्ष्याच्या आवाजाबाबत अनेक समजुती प्रचलित आहेत. विशेषतः रात्री टिटवी मोठ्याने ओरडली की काहीतरी अशुभ घडणार, अशी भीती व्यक्त केली जाते. मात्र, या समजुतीमागे खरोखर काही वैज्ञानिक आधार आहे का? चला जाणून घेऊया...
Titavi Bird Death Myth Explained
esakal
टिटवी हा अत्यंत सतर्क आणि जागरूक पक्षी आहे. परिसरात कोणतीही हालचाल, एखादा प्राणी, माणूस किंवा संभाव्य धोका जाणवला की ती मोठ्या आवाजात ओरडून इशारा देते. तिचा हा आवाज म्हणजे सावधानतेचा संकेत असतो, भविष्यवाणी नव्हे.
Titavi Bird Death Myth Explained
esakal
टिटवी झाडावर घरटे बांधत नाही. ती जमिनीवरच अंडी घालते. त्यामुळे तिच्या घरट्याजवळ कोणी गेले किंवा धोका निर्माण झाला, तर ती सतत आवाज करून शत्रूला दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. हा तिचा नैसर्गिक संरक्षणात्मक स्वभाव आहे.
Titavi Bird Death Myth Explained
esakal
धोका मोठा वाटल्यास अनेक टिटव्या एकत्र येऊन जोरात आवाज करतात. हा त्यांचा सामूहिक संरक्षणाचा उपाय आहे. एकत्रित आवाजामुळे संभाव्य शत्रू घाबरतो किंवा दूर पळतो.
Titavi Bird Death Myth Explained
esakal
टिटवीचा आवाज आणि मृत्यू यांचा संबंध असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. तिचा आवाज हा केवळ परिस्थितीनुसार दिलेला इशारा असतो. त्यामुळे मृत्यूची भविष्यवाणी करते, ही समजूत अंधश्रद्धेवर आधारित आहे.
Titavi Bird Death Myth Explained
esakal
पूर्वी ग्रामीण भागात रात्री पूर्ण शांतता असायची. अशा शांत वातावरणात टिटवीचा तीव्र आणि कर्कश आवाज लोकांना भयावह वाटायचा. त्यामुळे तिच्या आवाजाला अपशकुनाशी जोडण्यात आले. काळानुसार ही समजूत रूढ झाली.
Titavi Bird Death Myth Explained
esakal
पक्षी आणि प्राणी वातावरणातील सूक्ष्म बदल, हालचाल किंवा अनोळखी आवाज लवकर ओळखतात. मात्र ते ‘मृत्यू’ ओळखू शकतात, असा कोणताही ठोस संशोधन निष्कर्ष उपलब्ध नाही. टिटवीचे वर्तन हे तिच्या सुरक्षिततेशी संबंधित असते.
Titavi Bird Death Myth Explained
esakal
काही वेळा नैसर्गिक आपत्तीपूर्वी प्राणी-पक्ष्यांच्या वर्तनात बदल दिसून येतो, असे निरीक्षण आहे. परंतु, टिटवी विशेषतः मृत्यू किंवा विशिष्ट आपत्तीचा संकेत देते, असे सिद्ध झालेले नाही.
Titavi Bird Death Myth Explained
esakal
Why Bats Hang Upside Down
esakal