सकाळ डिजिटल टीम
एंडिजच्या पर्वतांमध्ये जगातील सर्वात मोठ्या खजान्याचा शोध लागला आहे. पर्वताच्या एका भागात तांबे, सोने आणि चांदीचे साठे आढळलेत.
चिली आणि अर्जेंटिनाजवळ हे साठे असून यात १.३ कोटी टन तांबे, १० लाख किलो सोनं आणि १८ कोटी किलो चांदी असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
खाणकाम इंडस्ट्रिशी संबंधित लोकांचा असा विश्वास आहे की एंडिजमध्ये खूप काही लपलं आहे. फिलो डेल सोल हे समुद्र सपाटीपासून जवळपास ५ हजार मीटर वर आहे.
समुद्रसपाटीपासून इतक्या उंचीवर असल्यानं लॉजिस्टिकसाठी अडचणी निर्माण होतात. हवामान आणि ऑक्सिजनची कमतरता यामुळे इथं काम करणं आव्हानात्मक आहे.
एंडीजमध्ये खाणकाम करणं हे सुरक्षित नाहीय. यामुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होतील असं पर्यावरणवाद्यांनी म्हटलंय.
एंडिजमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आणि हे ठिकाण उंचीवर असल्यानं काम करणाऱ्या व्यक्तींना विशेष प्रशिक्षण, आरोग्य तपासणी आणि इतर मदतीची गरज भासेल.