सकाळ डिजिटल टीम
आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला केव्हा ना केव्हा दुःख, संकटे येतच असताता. पण या सर्वांचे संधीत रूपांतर करण्याची कला प्रत्येकाकडेच नसते.
मात्र, जगप्रसिद्ध गायिका शकीराने तिच्या बॉयफ्रेन्डसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर आपले दु:ख व्यक्त करण्यासाठी नवा अल्बम रिलीज केला आहे.
शकीराने तब्बल सात वर्षांनंतर "लास मुजेरेस या नो लोरन" या अल्बमद्वारे संगीत विश्वात पुनरागमन केले आहे. यात तिने वैय्यक्तीक आयुष्य मांडले आहे.
शकीराने या अल्बममधील रिलीज केलेले पहिले गाणे जे थेट ब्रेकअपशी संबंधित आहे. त्याचे नाव "ते फेलिसिटो" असे आहे.
अल्बमध्ये दुसरे गाणे "मोनोटोनिया" हे सध्या खूप गाजत आहे. यात शकीराने तिच्या माजी प्रयकराचे नवी गर्लफ्रेन्ड मिळाल्याबद्दल व्यंग्यात्मक पद्धतीने अभिनंदन केले आहे.
शकीराच्या नव्या अल्बममधील "शकीरा: Bzrp म्युझिक सेशन्स, व्हॉल. 53," हे गाणे रसिकांनी सध्या डोक्यावर घेतले आहे. याला 24 तासांत 63 दशलक्षाहून अधिक YouTube व्ह्यूज मिळाले होते.
'Las Mujeres Ya No Lloran' मध्ये एकूण 16 गाणी आहेत, ज्यात आठ नवीन गाणी, एक रिमिक्स आणि सात पूर्वी न रिलीझ केलेले 'सिंगल्स' आहेत.