ताईनो, नखं न दुखवता लसूण सोलायचा सोपा फंडा! वाचा 'या' झटपट देशी टिप्स!

Aarti Badade

स्वयंपाकघरातील मोठे काम

स्वयंपाकाची चव वाढवणारा लसूण सोलणे हे सर्वात कंटाळवाणे काम मानले जाते, पण काही सोप्या युक्त्यांनी हे काम सोपे होऊ शकते.

Garlic peeling hacks

|

Sakal

गरम पाण्याचा वापर

लसणाच्या पाकळ्या ५ मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा, यामुळे साले मऊ होतात आणि अगदी सहज हाताने निघतात.

Garlic peeling hacks

|

Sakal

लाटण्याने लसूण सोला

लसणाच्या पाकळ्या एका कापडात गुंडाळा आणि त्यावर हलक्या हाताने लाटणे फिरवा; साले पाकळ्यांपासून लगेच वेगळी होतील.

Garlic peeling hacks

|

Sakal

चाकूने हलका दाब द्या

चॉपिंग बोर्डवर लसणाची पाकळी ठेवून चाकूच्या सपाट भागाने हलका दाब दिल्यास साल एका झटक्यात बाहेर येते.

Garlic peeling hacks

|

Sakal

'शेकिंग' पद्धतीचा वापर

एका डब्यात लसणाच्या पाकळ्या टाकून डबा जोरात हलवा (Shake); घर्षणामुळे बहुतांश साले आपोआप निघून जातील.

Garlic peeling hacks

|

Sakal

मायक्रोवेव्ह किंवा तवा ट्रिक

लसूण ३० सेकंद मायक्रोवेव्हमध्ये किंवा गरम तव्यावर हलका भाजून घेतल्यास त्याची साले कडक होऊन चटकन सोलली जातात.

Garlic peeling hacks

|

Sakal

तेलाचा वापर करा

लसूण सोलताना हाताला चिकटू नये म्हणून बोटांना थोडे तेल लावा, यामुळे काम अधिक वेगाने आणि सुलभतेने होते.

Garlic peeling hacks

|

Sakal

आरोग्यासाठी सुपरफूड

रोगप्रतिकारक शक्ती आणि पचन सुधारणारा हा लसूण आता या ट्रिक्स वापरून कोणत्याही त्रासाशिवाय रोजच्या आहारात वापरा!

Garlic peeling hacks

|

Sakal

आईच्या हाताची चव! 10 मिनिटांत तयार होणारा कुरकुरीत हलवा फिश फ्राय

Halwa Fish Fry Recipe

|

Sakal

येथे क्लिक करा