Shubham Banubakode
यवतमाळ जिल्ह्यातील सातेफळ गावा पाण्याची टंचाई जाणवते. पण येथील एक प्राचीन बारव आजही लोकांसाठी जीवनदायी ठरते.
Ancient Barav of Yavatmal
esakal
ही बारव सुमारे 700 वर्षांपूर्वीची असल्याचे मानले जाते. नंदा प्रकारातील ही बारव गावाच्या पूर्व भागात कपिलेश्वर मंदिराजवळ आहे.
Ancient Barav of Yavatmal
esakal
जगन्नाथ मोतीराम बाठ यांच्या शेतात ही बारव आजही सुस्थितीत आहे. आधुनिक काळातही तिचे अस्तित्व आश्चर्यचकित करणारे आहे.
Ancient Barav of Yavatmal
esakal
संपूर्ण बारव टणक दगडी चिऱ्यांनी बांधलेली आहे. रेखीव आणि मजबूत बांधकाम आजही तिच्या प्राचीन स्थापत्यकलेची साक्ष देते.
Ancient Barav of Yavatmal
esakal
बारवेत एकूण 20 पायऱ्या आहेत. वरून खाली उतरताना 10 पायऱ्या चौकोनी भागापर्यंत आणि पुढे 10 पायऱ्या थेट पाण्यापर्यंत जातात.
Ancient Barav of Yavatmal
esakal
सुमारे 25 फूट खोल असलेली ही बारव उन्हाळ्यातही आटत नाही. आजही जवळपास 15 फूट पाणी साठलेले असते.
Ancient Barav of Yavatmal
esakal
या बारवचे पाणी अत्यंत स्वच्छ, थंड आणि गोड आहे, असे ग्रामस्थ सांगतात.
Ancient Barav of Yavatmal
esakal
पाणीटंचाईच्या काळात ही बारव आजही गावासाठी जीवनरेखा आहे. आधुनिक सुविधांच्या अभावातही हा प्राचीन जलस्रोत लोकांचा आधार बनून उभा आहे.
Ancient Barav of Yavatmal
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Kokanai Mata Cave In Gondia
esakal