रात्री उशिरा जेवल्याने शरीरात होतात गंभीर बदल!

Aarti Badade

रात्री उशिरा जेवता?

नव्या संशोधनानुसार ही सवय आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक!

Late Night Meals Can Harm Your Health

|

Sakal

खाण्याची वेळही महत्त्वाची

फक्त काय आणि किती खाता हेच नाही, तर कधी खाता हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
रात्री उशिरा जेवल्याने शरीराच्या नैसर्गिक जैविक घड्याळावर परिणाम होऊ शकतो.

Late Night Meals Can Harm Your Health

|

Sakal

वाढू शकते शरीरातील चरबी

उशिरा जेवण केल्याने शरीरात अतिरिक्त चरबी साचण्याचा धोका वाढतो.
विशेषतः पोटाभोवती चरबी (बेली फॅट) वाढण्याची शक्यता अधिक असते.

Late Night Meals Can Harm Your Health

|

Sakal

रक्तातील साखर बिघडू शकते

रात्री उशिरा जास्त कॅलरी, कार्बोहायड्रेट्स आणि फॅटयुक्त पदार्थ खाल्ल्यास
रक्तातील साखरेचे संतुलन बिघडून मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

Late Night Meals Can Harm Your Health

|

sakal

कोलेस्ट्रॉलवरही परिणाम

अयोग्य वेळी जेवण केल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि लिपिडची पातळी वाढू शकते.
यामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढण्याची शक्यता असते.

Late Night Meals Can Harm Your Health

|

Sakal

सकाळचा नाश्ता टाळणे

रात्री उशिरापर्यंत जागणारे अनेकजण सकाळचा नाश्ता कमी करतात.
त्यामुळे रात्री जास्त खाण्याची सवय लागते आणि पोषणाचा समतोल बिघडतो.

Late Night Meals Can Harm Your Health

|

Sakal

काय करावे?

रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान २–३ तास आधी घ्या.
हलका, संतुलित आहार घ्या आणि उशिरा जंक फूड किंवा गोड पदार्थ खाणे टाळा.

Late Night Meals Can Harm Your Health

|

Sakal

आहारतज्ज्ञांचा सल्ला

ही माहिती एका संशोधनावर आधारित असून सामान्य आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. आहार आणि जीवनशैलीबाबत वैयक्तिक सल्ल्यासाठी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Late Night Meals Can Harm Your Health

|

Sakal

मोहरीचे तेल आरोग्यासाठी वरदान! जाणून घ्या 10 फायदे

Health Benefits of Mustard Oil

|

Sakal

येथे क्लिक करा