Anushka Tapshalkar
मेंदू आपल्या शरीराचे संपूर्ण कार्य सुरळीत चालण्यासाठीचा एक महत्त्वाचा अवयव आहे. यामुळे त्याची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.
शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला नियमित ७-८ तासांच्या झोपेची गरज असते. परंतु अनियमित झोपेच्या सवयीमुळे त्याचे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. चला तर मग जाणून घेऊया...
अनियमित झोपेच्या सवयीमुळे स्मरणशक्ती कमी होते, निर्णयक्षमता घटते आणि मेंदूचा ब्रेकडाउन व्हायला सुरुवात होते.
शरीरातील हार्मोन्स संतुलित राहावेत म्ह्णून पुरेशी झोप घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. अनियमित झोपेमुळे हार्मोनल असंतुलन होते, वजन वाढते, चयापचय(metabolism) मंदावते, त्यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होतो.
झोपेच्या अभावी शरीरातील कोर्टिसोलची (स्ट्रेस हार्मोन) पातळी वाढते आणि मग मूड स्विंग्स होणे, चिडचिड होणे अशा समस्या निर्माण होतात.
तुम्ही जर पुरेशी झोप घेत नसाल तर ते तुमच्या चेहऱ्यावरून लगेच कळते. अपुऱ्या झोपेमुळे चेहऱ्याची चमक जाऊन चेहरा निस्तेज दिसू लागतो, डोळ्यांखाली डार्क सरकल्स तयार होतात आणि त्वचा सुद्धा कोरडी पडते.
तुम्ही उशिरा झोपत असाल किंवा अवेळी झोपत असाल तर त्यामुळे शरीरातील डोपमीनची पातळी कमी होते. परिणामी ऊर्जा कमी होते आणि उत्साह कमी होतो.
उशिरा झोपल्याने किंवा अनियमित झोपेमुळे शरीराचे आरोग्य बिघडते. ज्यामुळे मधुमेह, हृदयरोग, नैरश्य असे दीर्घकालीन आजर होण्याचा धोका निर्माण होतो.
नियमित आणि योग्य झोप घेतल्याने आपले शारीरिक आणि मानसिक दोन्हीही आरोग्य टिकून राहते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.