सकाळ डिजिटल टीम
लातूरजवळील बार्शी रोडवरील हॉटेल जलपरीचे मालक रवी काळे हे सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. त्यांचे रिल्स खूप व्हायरल होत असतात.
रवी काळे यांच्या डायलॉगमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही हे अनोख्या शैलीत रवी काळे बोलतात.
रवी काळे यांनी नुकतीच थार रॉक्स गाडी घेतलीय. त्यांनी याचं रीलही शेअर केलं असून आता त्याची चर्चा सोशल मीडियावर होतेय. १५ लाखांपासून या गाडीची किंमत आहे.
गाडी घेताना रवी काळे यांच्यासोबत हॉटेल भाग्यश्रीचे मालक लैला हेसुद्धा आहेत. लैला यांनीही काही दिवसांपूर्वी फॉर्च्युनर गाडी घेती होती.
थार गाडीचे रील शेअर करताना रवी काळे म्हणाले की, 'मोठ्यानं घेतला हत्ती, बारक्यानं घेतला घोडा…, नका बसू घरी, चला जलपरी'
हॉटेल भाग्यश्रीचे मालक लैला म्हणाले की, 'धमाका म्हणलं की हॉटेल भाग्यश्री आणि हॉटेल जलपरी, नाद करतो का?'
स्वत:च्या हॉटेल व्यवसायाला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढवणाऱ्या रवी काळे आणि लैला यांच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे.
हॉटेल भाग्यश्री आणि हॉटेल जलपरीचे मालक एकत्र येऊन हे रील केल्यानं आता दोघांच्याही फॉलोअर्सनी कमेंटमध्ये अभिनंदन केलंय.