संतोष कानडे
उत्तर युरोपमधील बाल्टिक देशांपैकी एक असेलल्या लातविया देशात मुलींसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.
कारण या देशात अंदाजे आठ ते साडेआठ लाख पुरुष आहेत. तर दहा ते साडेदहा लाख महिला आहेत.
त्यामुळे या देशात भाडेत्त्वावर नवरा घेण्याची वेळ आलीय. तेथील सरकारने नवऱ्या मुलांसाठी काही योजनादेखील सुरु केल्या आहेत.
लातविया देशातील मुली उंच, गोऱ्या, हरिणीसारख्या डोळ्यांच्या आणि सुंदर केसांच्या आहेत. मात्र त्यांना पती मिळत नसल्याने त्या त्रस्त आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे देशातील मुली स्वतंत्र, आर्थिक स्थैर्य असलेल्या आहेत.
आपल्याकडे याउलट परिस्थिती आहे. मुलांची लग्न होत नसल्याने त्यांचं वयदेखील उलटून चाललंय.
महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये मागच्या पाच वर्षांपासून शंभर ते दोनशे तरुण बिनलग्नाचे आहेत.
युरोस्टॅटच्या आकडेवारीनुसार, लातवियामध्ये पुरूषांपेक्षा महिलांचे प्रमाण १५.५ टक्क्यांनी अधिक आहे.
या संबंधीच्या काही डॉक्युमेंटरीही पब्लिश झालेल्या आहेत. पैसे कमावणारी बायको, आयतं घर आणि वरुन सरकारचे पैसे.. हे कोणाला नकोय?