खळखळून हसणं ठरू शकतं घातक! जाणून घ्या या धोक्याची कारणं

Aarti Badade

हसण्याचे फायदे

हसणं ही एक अशी गोष्ट आहे जी तणाव दूर करून तुमचा मूड चांगला करते; खळखळून हसणं हा तर एक नैसर्गिक व्यायामच मानला जातो.

Sakal

दुर्मिळ धोका

पण तुम्हाला माहीत आहे का, काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये खूप मोठ्याने आणि जास्त वेळ हसणं आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण करू शकते.

Sakal

अचानक बेशुद्धी

जास्त मोठ्याने हसल्याने रक्तदाबात (Blood Pressure) अचानक घट होते, ज्यामुळे व्यक्ती अचानक बेशुद्ध (Syncope) पडू शकते.

Sakal

हृदयाचे विकार

ज्यांना हृदयाचे विकार (Heart Problems) आहेत, त्यांना जास्त हसल्यामुळे कार्डियाक ॲरिथमिया (अनियमित हृदयाचे ठोके) जाणवू शकतात.

Sakal

अन्ननलिका फाटणे

अतिशय जोरदार हसल्यामुळे दुर्मिळ घटनांमध्ये अन्ननलिका (Food Pipe) फाटण्याचा (Esophageal Rupture) धोका निर्माण होतो, ज्यासाठी त्वरित वैद्यकीय मदतीची गरज असते.

Sakal

शारीरिक प्रक्रिया

हसताना डायाफ्राम आणि श्वसनाचे स्नायू वेगाने हलतात, ज्यामुळे हृदय गती (Heart Rate) आणि ऑक्सिजनचे सेवन वाढते.

Sakal

कोणासाठी जास्त धोका?

हृदयाचे आजार, न्यूरोलॉजिकल विकार किंवा जठरासंबंधी कमजोरी असलेल्या व्यक्तींसाठी जास्त हसणं ही एक गंभीर समस्या बनू शकते, त्यामुळे आनंद घ्या, पण जागृत रहा!

Sakal

नयनरम्य निसर्ग आणि विविध पदार्थांची मेजवाणी, दक्षिण भारतातील नृत्यांची परंपरा जपणारे हे स्थळ नक्की पहा

Sakal

येथे क्लिक करा