नयनरम्य निसर्ग आणि विविध पदार्थांची मेजवाणी, दक्षिण भारतातील नृत्यांची परंपरा जपणारे हे स्थळ नक्की पहा

Aarti Badade

दक्षिण भारताची ओळख

दक्षिण भारत हा निसर्ग, संस्कृती आणि अध्यात्माचा एक अनोखा मिलाफ असून, येथे हिरवळीपासून ते समुद्रकिनाऱ्यांपर्यंत सर्वकाही एकाच ठिकाणी पाहायला मिळते.

Sakal

केरळचे मंत्रमुग्ध सौंदर्य

हिरवीगार झाडे, अलेप्पीचे बॅकवॉटर, आयुर्वेदिक मसाले आणि हाऊसबोट्समुळे केरळ हे नैसर्गिक दृश्यांसाठी दक्षिण भारतातील सर्वात सुंदर शहर आहे, जिथे ३ दिवसांचा खर्च ₹१०,००० ते ₹२०,००० पर्यंत येऊ शकतो.

Sakal

केरळमधील पर्यटन स्थळे

केरळमध्ये तुम्हाला मुन्नार (हिल स्टेशन), अलेप्पी (बॅकवॉटर), कोची आणि थेक्कडी यांसारखी अनेक संस्मरणीय ठिकाणे एक्सप्लोर करता येतात.

Sakal

तामिळनाडूतील भव्य मंदिरे

तामिळनाडू आपल्या प्राचीन मंदिरांसाठी (मीनाक्षी मंदिर) आणि शास्त्रीय नृत्य भरतनाट्यमसाठी ओळखले जाते, जेथे रामेश्वरम आणि कन्याकुमारी या धार्मिक स्थळांना ₹८,००० ते ₹१५,००० मध्ये भेट देता येते.

Sakal

कर्नाटकातील अनोखा संगम

पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय असलेल्या कर्नाटकात इतिहास आणि निसर्गाचा संगम दिसतो, जिथे हंपीचे अवशेष आणि कॉफीच्या बागा विशेष मनमोहक आहेत.

Sakal

कर्नाटकमधील अनुभव

कर्नाटकात म्हैसूर पॅलेस, हिल स्टेशन्स (ट्रेकिंग) आणि कॉफीची चव घेण्याचा अनोखा अनुभव मिळतो, ज्यासाठी पॅकेज घेतल्यास सुमारे ₹३०,००० खर्च येऊ शकतो.

Sakal

दक्षिण भारताचे वैशिष्ट्य

स्वादिष्ट अन्न, पारंपरिक नृत्य आणि लोकसंस्कृती ही दक्षिण भारताची खास वैशिष्ट्ये असून, यामुळे हा भाग फिरायला जाण्यासाठी सर्वात उत्तम आहे.

Sakal

पेशव्यांची जन्मभूमी असणाऱ्या श्रीवर्धनला भेट देताय? मग या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या!

Sakal

येथे क्लिक करा