Monika Shinde
हसणं हे औषध आहे! लाफ्टर थेरपीमध्ये कृत्रिम किंवा नैसर्गिक हसण्याचा वापर करून शरीर आणि मन दोघांनाही ताजेतवाने केले जाते.
हसल्याने डोपामिन आणि एंडोर्फिन सारखे “हॅपी हार्मोन्स” वाढतात. यामुळे तुमचं मूड लगेचच सुधारतं आणि तुम्ही अधिक सकारात्मक वाटू लागता.
लाफ्टर थेरपी तणाव कमी करते, मन शांत करते आणि विचारशक्ती सुधारते. दररोज हसल्याने मानसिक आरोग्य चांगले राहते.
हसल्यामुळे मेंदूला अधिक ऑक्सिजन मिळतो. यामुळे लक्ष केंद्रित होण्याची क्षमता वाढते आणि स्मरणशक्ती सुधारते.
हसण्याने पोटातील स्नायूंना चालना मिळते, त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि अपचन, गॅससारख्या समस्या कमी होतात.
हसण्यामुळे नैसर्गिक पेनकिलर्स सक्रिय होतात. त्यामुळे सांधेदुखी, डोकेदुखी यासारख्या वेदना काही प्रमाणात कमी होतात.
हसल्यामुळे मनावरचा भार हलका होतो, चिंता कमी होते आणि त्यामुळे झोप चांगली लागते.