शहराच्या धावपळीपासून दूर जायचंय? भारतातील ही ७ शांत गावं ठरतील बेस्ट डेस्टिनेशन

Anushka Tapshalkar

हा, अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेशातील या गावाची लोकसंख्या अवघी २८९ आहे. समुद्रसपाटीपासून ४,७८० फूट उंचीवर वसलेल्या या गावातील मेंगा गुहा आणि भगवान शंकराचं मंदिर प्रसिद्ध आहे.

Ha, Arunachal Pradesh

|

sakal

स्कुरू, नुब्रा व्हॅली, लडाख

लडाखमधील स्कुरू गावात अवघी २३० लोकवस्ती आणि ५२ घरं आहेत. समुद्रसपाटीपासून १० हजार फुटांवर असलेल्या या गावात पोहोचण्यासाठी चार दिवसांचा ट्रेक करावा लागतो.

Skuru, Nubra Valley, Ladakh

|

sakal

कांजी, लेह, लडाख

लडाखमधील कांजी गावाची लोकसंख्या ३२५ आहे. समुद्रसपाटीपासून १२,६०० फूट उंचीवर कांजी नदीच्या काठावर वसलेलं हे गाव ट्रेकिंग आणि निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.

Kanji, Leh, Ladakh

|

sakal

किब्बर, स्पिती, हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशातील किब्बर गावाची लोकसंख्या ३६६ आहे. १४,२०० फूट उंचीवरील या गावातील पारंपरिक घरं आणि जवळचा प्रसिद्ध 'की' मठ आकर्षण आहेत.

Kibbar, Spiti, Himachal Pradesh

|

sakal

लोसर, स्पिती, हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशातील लोसर गावाची लोकसंख्या ३२८ आहे. स्पिती खोऱ्याचं प्रवेशद्वार असलेलं हे गाव चंद्रा नदीच्या काठावर वसलेलं असून, शेती आणि निसर्गरम्य परिसरासाठी प्रसिद्ध आहे.

Losar, Spiti, Himachal Pradesh

|

sakal

सांक्रि, उत्तरकाशी, उत्तराखंड

उत्तराखंडमधील सांक्रि गावात २७० लोकसंख्या आणि ७७ घरं आहेत. हर की दून आणि केदारकंठा ट्रेकसाठी हे गाव प्रसिद्ध आहे.

Sankri, Uttarkashi, Uttarakhand

|

sakal

ईस्ट आयलंड, अंदमान आणि निकोबार

अंदमानमधील ईस्ट आयलंडची लोकसंख्या अवघी १६ असून, शांतता आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी हे बेट प्रसिद्ध आहे.

East Island, Andaman-Nicobar

|

sakal

तटबंदीच्या आत वसलंय महाराष्ट्रातील हे संपूर्ण गाव!

Maharashtra's Unique Village

|

eSakal

आणखी वाचा