Varsha Balhe
अनेकदा अचानक डावा डोळा फडफडू लागतो आणि मनात विचार येतो, की हा काही शुभ संकेत आहे की अशुभ? याबाबत ज्योतिषशास्त्रात काही मान्यता आहेत. पण डोळा फडफडण्यामागे वैज्ञानिक कारणंही आहेत.
LEFT EYE TWITCHING GOOD OR BAD?
esakal
ज्योतिषशास्त्रातील मान्यतेनुसार, महिलांचा डावा डोळा फडफडणे शुभ मानलं जातं. चांगली बातमी मिळणे किंवा एखादी इच्छा पूर्ण होणे, असे संकेत याच्याशी जोडले जातात.
LEFT EYE TWITCHING GOOD OR BAD?
esakal
काही पारंपरिक मान्यतांनुसार, पुरुषांचा डावा डोळा फडफडणे अशुभ मानलं जातं. कामात अडथळे किंवा तणाव येण्याचे संकेत असं त्याकडे पाहिलं जातं.
LEFT EYE TWITCHING GOOD OR BAD?
esakal
डावा डोळा फडफडणे शुभ की अशुभ, याबाबत वेगवेगळ्या मान्यता आहेत. मात्र, यामुळे भविष्यात चांगली किंवा वाईट घटना घडते, याला वैज्ञानिक पुरावा नाही.
LEFT EYE TWITCHING GOOD OR BAD?
esakal
रात्री पुरेशी झोप झाली नाही किंवा शरीराला थकवा आला, तर डोळ्याच्या आजूबाजूचे स्नायू फडफडू शकतात. बहुतेक वेळा हा त्रास काही वेळाने आपोआप थांबतो.
LEFT EYE TWITCHING GOOD OR BAD?
esakal
मोबाईल किंवा संगणकाच्या स्क्रीनकडे बराच वेळ पाहिल्याने डोळ्यांवर ताण येऊ शकतो. तणाव आणि चहा-कॉफीचं जास्त सेवन यामुळेही डोळा फडफडण्याचा त्रास होऊ शकतो.
LEFT EYE TWITCHING GOOD OR BAD?
esakal
पुरेशी झोप घ्या, स्क्रीनपासून अधूनमधून विश्रांती घ्या आणि चहा-कॉफीचं जास्त सेवन टाळा. डोळा फडफडण्याचा त्रास सतत होत असेल किंवा डोळा उघडण्यात अडचण, चेहऱ्याच्या इतर भागांतही फडफडणे किंवा दृष्टीत बदल जाणवत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
LEFT EYE TWITCHING GOOD OR BAD?
esakal
वैद्यकीय भाषेत डोळ्याच्या पापणीचं फडफडणं याला आयलिड मायोकायमिया म्हणतात. अपुरी झोप, थकवा, तणाव आणि कॅफीन यामुळे असं होऊ शकतं. त्यामुळे डावा डोळा फडफडला म्हणजे काही शुभ किंवा अशुभ घडणार, असं समजण्याचं कारण नाही.
LEFT EYE TWITCHING GOOD OR BAD?
esakal
WHY DO LEOPARDS HAVE SPOTS
esakal