Anushka Tapshalkar
बऱ्याचदा रात्री जेवण शिल्लक राहते.आणि दुसऱ्या दिवशी त्याचे काय बनवायचे असा अनेकदा प्रश्न पडतो. जर रात्रीचा भात शिल्लक राहिला तर त्याचा अशा सोप्या पद्धतीने व्हेज फ्राईड राईस बनवा.
तेल, बारीक चिरलेली कांद्याची पात,बारीक चिरलेला पातीचा कांदा, बारीक चिरलेले गाजर, बारीक चिरलेला श्रावण घेवडा, मीठ, पांढरी मिरपूड, सोया सॉस, व्हिनेगर किंवा लिंबू, साखर आणि रात्रीचा उरलेला भात. याव्यतिरिक्त तुमच्याकडे असलेल्या आणि तुम्हला आवडणाऱ्या भाज्या तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता.
सर्वप्रथम मोठ्या आचेवर तुमचा पॅन किंवा कढई गरम करून घ्या.
आता पॅन किंवा कढई मध्ये तेल टाकून ते व्यवस्थित गरम करून घ्या.
तेल व्यवस्थित गरम झाले की त्यात बारीक चिरलेला कांदा, गाजर, श्रावण घेवडा आणि इतर चिरलेल्या भाज्या घालून १-२ मिनिट शिजवून घ्या.
आता रात्रीचा उरलेला भात, चवीला मीठ व पांढरी मिरपूड, बारीक चिरलेली कांद्याची पात, थोडा सोया सॉस, व्हिनेगर किंवा लिंबाचा रस, साखर हे सगळे भाज्यांमध्ये घाला. १-२ मिनिटांसाठी मोठ्या आचेवर व्यवस्थित शिजवा.
भात पूर्ण शिजल्यावर आता एका प्लेट मध्ये सर्व्ह करा, त्यावर सजावटीसाठी बारीक चिरलेली कांद्याची पात घालून व्हेज फ्राईड राईसचा आनंद घ्या.