Anushka Tapshalkar
आरोग्यासाठी गरजेचे असलेल्या पोषकमूल्यांनी परिपूर्ण असा मटार आणि बासमती तांदळाचा मटार पुलाव सगळ्यांनाच आवडेल.
भिजवलेला तांदूळ, तूप, जीरे , खिसलेलं आलं, मटार, धना-पावडर, गरम मसाला, मीठ, हळद आणि पाणी.
सर्वप्रथम तांदूळ नीट धुऊन १ तास भिजत ठेवा. यामुळे तांदूळ अधिक जाड आणि मऊ होईल.
एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तूप गरम करून घ्या. त्यात जीरे टाका व ते तडतडू द्या. नंतर किसलेलं आलं टाका आणि १ मिनिटासाठी परतून घ्या.
त्यात मटार ताक आणि २-३ मिनिटे शिजवून घ्या. तुम्ही जर गोठलेले मटार वापरात असाल तर ते चांगले शिजेपर्यंत परता.
आता त्यात धने पावडर, गरम मसाला, हळद, आणि मीठ टाका. मसाले चांगले मिक्स करा जेणेकरून ते एकजीव होतील व मटारलाही त्याची चव येईल.
भिजवलेला तांदूळ पॅनमध्ये किंवा कढईमध्ये टाका आणि हलक्या हाताने मिक्स करा. त्यात 2 कप पाणी टाका आणि एक उकळी येऊ द्या.
एकदा पाणी उकळायला लागल्यावर गॅस कमी करा, पॅन किंवा कढई झाकून ठेवा आणि तांदूळ 15-20 मिनिटे शिजू द्या, जेणेकरून पाणी पूर्णपणे शोषून तांदूळ मऊ आणि पुन्हा फुलले जातील.
तुमचा मटर पुलाव आता तयार आहे! त्याला ताज्या कोथिंबिरीने सजवा आणि त्याचा आस्वाद घ्या.