Aarti Badade
मुर्ग मुसल्लम म्हणजे अख्खं चिकन वापरून तयार केलेली एक अत्यंत रिच आणि शाही डिश. विशेषतः सण किंवा पाहुण्यांसाठी ही मेजवानी उत्तम ठरते.
Murg Musallam Recipe Marathi
Sakal
२ किलो अख्ख्या चिकनला दही, आलं-लसूण पेस्ट, तिखट, गरम मसाला, कसुरी मेथी आणि तेल लावून ६-७ तास फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे मसाला आतपर्यंत मुरतो.
Murg Musallam Recipe Marathi
sakal
मॅरीनेट केलेले चिकन ओव्हनमध्ये २० मिनिटे ग्रिल करा किंवा गॅसवर चिमट्याच्या साहाय्याने भाजून घ्या, ज्यामुळे त्याला तंदुरीसारखी छान चव येईल.
Murg Musallam Recipe Marathi
Sakal
काजू आणि मगज बिया तळून त्यांची पेस्ट करा. तसेच कांदा गोल्डन ब्राऊन तळून त्याचीही पेस्ट तयार ठेवा. हेच या ग्रेव्हीच्या रिचनेसचे गुपित आहे.
Murg Musallam Recipe Marathi
Sakal
मोठ्या भांड्यात तेल गरम करून दालचिनी, लवंग, तेजपत्ता आणि मोठी वेलची परता. त्यानंतर आलं-लसूण पेस्ट आणि धने-जिरे पावडर घालून मसाला तेल सुटेपर्यंत भाजा.
Murg Musallam Recipe Marathi
Sakal
फेटलेले दही घालून सतत हलवा. त्यानंतर तळलेल्या कांद्याची पेस्ट आणि काजू पेस्ट घालून ग्रेव्ही घट्ट आणि मलाईदार होईपर्यंत शिजू द्या.
Murg Musallam Recipe Marathi
Sakal
तयार ग्रेव्हीत भाजलेले अख्खे चिकन ठेवा. वरून उरलेले मॅरीनेशनचे पाणी घाला आणि झाकण ठेवून १० मिनिटे मंद आचेवर वाफू द्या.
Murg Musallam Recipe Marathi
Sakal
गरमागरम मुर्ग मुसल्लमवर उकडलेली अंडी, कोथिंबीर आणि लिंबू घालून सजवा. हे चिकन तुम्ही नान, तंदुरी रोटी किंवा जिरा राईससोबत एन्जॉय करू शकता!
Murg Musallam Recipe Marathi
Sakal
kolambi Masala
Sakal