Saisimran Ghashi
संधिवातचा त्रास सुरू होण्याआधी काही लक्षणे जाणवतात.
सकाळी उठल्यावर सांध्यांमध्ये कडकपणा जाणवणे,विशेषतः गुडघे, घोटे, बोटांचे सांधे.
चालताना पायात तीव्र किंवा मंद वेदना जाणवणे. थोडं चालल्यावरच पाय थकतात.
सांध्यांमध्ये सूज येते व स्पर्श केला तर दुखते.
सांध्यांच्या भागात उष्णता किंवा लालसरपणा जाणवणे. ही लक्षणे संधिवाताची सुरुवात असू शकतात.
दिवसभर अकारण थकवा जाणवतो, एनर्जी कमी वाटते.
सांध्यांमध्ये खडखड आवाज येणे किंवा हालचालींमध्ये अडथळा येणे
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.