लिंबू कॉफी खरंच वजन घटवते? जाणून घ्या खरं काय

Anushka Tapshalkar

ब्लॅक कॉफी अन् लिंबाच्या रसाचा ट्रेंड

ब्लॅक कॉफीमध्ये लिंबाचा रस मिसळून पिण्याचा ट्रेंड सध्या चर्चेत आहे. हे पेय वजन कमी करण्यास आणि शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते, असा दावा केला जातो.

Does lemon coffee help with weight loss

|

sakal

वजन कमी करण्यासाठी खरंच फायदेशीर?

कॉफीमधील कॅफीन काही काळासाठी चयापचय आणि ऊर्जा वापर वाढवू शकते. काही लोकांमध्ये भूकही थोडी कमी होऊ शकते. मात्र, यामुळे झपाट्याने वजन कमी होते, असे ठोस पुरावे नाहीत.

Does lemon coffee help with weight loss

|

sakal

लिंबामुळे मिळते व्हिटॅमिन C

लिंबू हे व्हिटॅमिन C चा चांगला स्रोत आहे. मात्र, कॉफीमध्ये लिंबाचा रस मिसळल्याने शरीरातील फॅट लक्षणीय प्रमाणात कमी होते, असे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.

Does lemon coffee help with weight loss

|

sakal

‘डिटॉक्स ड्रिंक’ समजणे चुकीचे

ब्लॅक कॉफी आणि लिंबाचे मिश्रण शरीरातील विषारी घटक बाहेर काढते, असे मानण्याचे ठोस कारण नाही. शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याचे काम यकृत आणि मूत्रपिंड नैसर्गिकरित्या करतात.

Does lemon coffee help with weight loss

|

sakal

ॲसिडिटीचा त्रास असेल तर सावध!

ॲसिडिटी, गॅस, छातीत जळजळ किंवा ॲसिड रिफ्लक्सचा त्रास असणाऱ्यांना हे मिश्रण त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे अशा व्यक्तींनी सावधगिरी बाळगावी.

Does lemon coffee help with weight loss

|

sakal

जास्त कॉफीही ठरू शकते नुकसानकारक

अति कॅफीन सेवनामुळे झोपेचा त्रास, अस्वस्थता, हृदयाची गती वाढणे आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कॉफीचे सेवन मर्यादित ठेवणे महत्त्वाचे आहे.

Does lemon coffee help with weight loss

|

sakal

वजन कमी करण्यासाठी काय महत्त्वाचे?

वजन नियंत्रणासाठी केवळ लिंबू कॉफीवर अवलंबून राहू नका. संतुलित आहार, पुरेसे प्रथिने आणि फायबर, नियमित शारीरिक हालचाल आणि चांगली झोप यांची भूमिका अधिक महत्त्वाची आहे.

Does lemon coffee help with weight loss

|

sakal

रोज चिमूटभर हिंग खाल्ल्याने शरीराला मिळतात 'हे' ८ फायदे

Hing Benefits For Health

|

eSakal

आणखी वाचा