एक लिंबू, अनेक फायदे! सरबतापुरताच नाही; जाणून घ्या 9 उपयोग

Aarti Badade

लिंबाचा असा करा स्मार्ट वापर!

लिंबू आपल्या स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा घटक आहे. पण त्याचा वापर फक्त चवीपुरता मर्यादित न ठेवता, दैनंदिन जीवनात अनेक समस्यांवर तो रामबाण उपाय ठरू शकतो.

Lemon Hacks

|

Sakal

स्वयंपाकातील 'मॅजिक' टिप्स

भात शिजवताना त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकल्यास भात पांढराशुभ्र आणि मोकळा होतो. सफरचंद किंवा इतर फळांचे तुकडे काळे पडू नयेत म्हणून त्यांना थोडा लिंबू रस लावून ठेवा.

Lemon Hacks

|

Sakal

चवीचे संतुलन साधा

जर चुकून भाजी किंवा आमटीत मीठ किंवा तिखट जास्त झाले असेल, तर घाबरू नका! त्यात थोडे लिंबू पिळा, यामुळे चवीचा समतोल राखला जातो.

Lemon Hacks

|

Sakal

लिंबाच्या सालीचा वापर

लिंबाचा रस काढून झाल्यावर साल फेकून देऊ नका. ही साल किसून मिठाई, केक किंवा सॅलड ड्रेसिंगमध्ये घातल्यास पदार्थाला एक वेगळीच आणि छान चव येते.

Lemon Hacks

|

Sakal

आरोग्य आणि पचन

कोमट पाण्यात लिंबू रस घालून प्यायल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.जेवणानंतर कोमट पाण्यात लिंबू घेतल्यास पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी होतो.

Lemon Hacks

|

Sakal

झटपट क्लिनिंग हॅक्स

एका वाटीत पाण्यात लिंबू रस घालून ते पाणी मायक्रोवेव्हमध्ये उकळवा. वाफेमुळे आतील चिकटपणा सहज निघून जातो.लिंबू दीर्घकाळ ताजे राहण्यासाठी ते फ्रीजमध्ये ठेवा.

Lemon Hacks

|

Sakal

सौंदर्य खुलवण्यासाठी लिंबू

जर तुमची त्वचा कोरडी किंवा खरबरीत झाली असेल, तर लिंबाची साल आणि साखर एकत्र करून त्वचेवर चोळा (Scrub). यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि त्वचा मऊ होते.

Lemon Hacks

|

Sakal

छोटी गोष्ट, मोठे फायदे!

एक छोटासा लिंबू तुमचे आरोग्य, सौंदर्य आणि स्वयंपाकघर या तिन्हींसाठी फायदेशीर आहे. या टिप्स आजच वापरून पहा!

Lemon Hacks

|

Sakal

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची? हिवाळ्यात खा ‘या’ भाज्या

Best vegetables for diabetes

|

Sakal

येथे क्लिक करा